पाथ अबँकस’ महिलांना रोजगार संधी

30

लॉकडाऊन नंतर सर्वांचीच जिवन शैली बदलून गेली आहे. मोठमोठ्या शहरात जाऊन खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचा रोजगार गेला, छोटेमोठे उद्योग करणाऱ्या महिलांचा सुद्धां रोजगार गेला. लॉकडाऊन नंतर उदरनिर्वाहासाठी वेगवेगळ्या मार्गाचा वापर करण्यात आला जसे शहरात काम खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची नोकरी गेली आणि गावाकडे जाऊन दैनंदिन जीवनातील आवश्यक वस्तू विकणे, स्वयंपाक घरात लागणारा भाजीपाला विकणे अशा प्रकारचे कामे सुरू केले. बऱ्याच सुशिक्षित आणि होतकरू महिलांना शहरात जाऊन नोकरी करून स्वतः च्या पायावर उभे राहुन स्वतः चे अस्तित्व निर्माण करण्याचे स्वप्न आहेत. परंतु लॉकडाऊन मध्ये झालेली व्यक्तींची गैरसोय बघता.

बऱ्याच प्रमाणात लोक शहरात जाऊन, कुटूंबापासुन दुर जाऊन नवीन रोजगार शोधने वा स्वतः चे काही तयार करणे यासाठी तयायच होत नाहीत असे दिसते. परंतु जिवन जगताना सर्वात सर्वात महत्त्वाचा असतो पैसा आणि पैशा कमवायचा तर मेहनत कराविच लागते. बऱ्याच महिला सुशिक्षित आहेत, काहीतरी नवीन करण्याची ईच्छा आहे. तरी लॉकडाऊन नंतर त्यांचे स्वप्न पुर्ण होतील याची शाश्वती नाही.लॉकडाऊन, सुशिक्षित महिलांची मानसिकता, नवीन काही करण्याची उम्मीद , या गोष्टींची जाणीव ठेवून अपर्णा माधवे व प्रफुल्ल माधवे या दांपत्याने लॉकडाऊन काळातच भविष्याच्या विचार करून वरिल प्रश्नांची उत्तरे शोधली आहेत. अपर्णा माधवे व प्रफुल्ल माधवे हे दोघेही उच्च शिक्षीत दांपत्य आहेत. कॉलेज वयापासून समाजसेवेचा ध्यास असलेल्या दांपत्याने सरकारी, निम सरकारी व असरकारी संस्थेशी जोडून अनेक वर्षे कार्य केले.

त्यामध्ये आरोग्य, शिक्षण, व्यक्तीमत्व विकास, डेव्हलपमेंट अशा वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी ठसा उमटवून स्वतः चे अस्तित्व निर्माण केले आहे. लॉकडाऊन नंतर ची परिस्थिती काय असेल याची पावले ओळखुन महिलांना सक्षम कसे कळता येईल अशा प्रकारचा विचार त्यांच्या डोक्यात येत होते आणि त्यावर ते उपाय शोधत होते. खरं तर लॉकडाऊन च्या सुट्टीचा फायदा महिलांनी नवीन नवीन पदार्थ कसे बनवायचे हे शिकले परंतु लॉकडाऊन नंतर शिकलेले पदार्थ नेहमीच करता यावे यासाठी महिला सक्षम कशा होतील यावर अपर्णा माधवे व प्रफुल्ल माधवे यांनी उत्तर शोधले. आणि सुशिक्षित होतकरू महिलांसाठी त्यांना चांगला प्लँटफॉर्म मिळाला. त्या प्लँटफॉर्म वर आल्यानंतर महिला स्वतः च्या परिवारा सोबत राहुन स्वतः ची कमाई करू शकतात. तो प्लँटफॉर्म म्हणजे अबँकस होय. अबँकस च्या माध्यमातून महिला आपल्याच घरी राहून आपल्या वेळेनुसार आर्थिक कमाई करून आपल्या शिक्षणाचा फायदा करू शकतात. शिवाय मुलांची विचार करण्याची क्षमता आणि मेंदुचा वापर करण्याची क्षमता सुद्धां विकसित करून मुलांना सकारात्मक बनवण्यासाठी मोठे योगदान देऊ शकतात.

पाथ अबँकस नावाने महिलांना सक्षम करून स्वाभिमानी बनवण्यासाठी जे पाऊल त्यांनी उचलले ते आता यशाकडे वाटचाल करून महिला आपल्या शिक्षणाचा फायदा आपल्या सक्षमीकरणासाठी करत आहेत. विद्यार्थ्यांना अबँकस शिकवून विद्यार्थ्यांना गणितासारख्या विषयाची गोडी लाऊन त्यांचा मानसिक विकास करण्यासोबतच महीलांना स्वतः च्या पायावर उभे करत आहेत। महाराष्ट्र अनेक ठिकाणी आज ‘पाथ अबँकसने’ आपले पाऊल रोवले तर आहेच शिवाय कर्नाटक, मध्यप्रदेश या राज्यामध्ये सुद्धां पाथ अबँकस ने महीलांचे सक्षमीकरण केले आहे. आपला छंद जोपासून महिला सक्षम होऊन आपल्या जिवनाला एक नवीन दिशा देऊ शकतात. आपल्याला काही नवीन करण्याची ईच्छा असेल आणि घरी राहुनच करायचे असेल तर आपल्याला ‘पाथ अबँकस’ दिशादर्शक ठरू शकतो. अपर्णा माधवे यांनी अबँकस सारखे आतंरराष्ट्रीय व श्रीमंत तंत्र गाव खेड्यात मध्यम वर्गात पोहचवून आदर्श महिला व आदर्श पिढी घडविण्याचा ध्यास घेतला आहे.

आजपर्यंत अबँकस मोठमोठ्या शहरामध्ये आणि श्रिमंताच्या मुलांकडे बघायला मिळत होते परंतु ‘पाथ’ च्या माध्यमातून अबँकस घराघरात व खिशाला परवडेल अशाच किंमतीमध्ये पोहचणार आहे. म्हणून सुशिक्षित महिलांना स्वतः च्या पायावर उभे राहून नाव लौकिक मिळविण्यासाठी मोठी संधी ‘पाथ अबँकस’ ने उपलब्ध करून दिली आहे. ज्या कोणी महीला शहरात जाऊन किंवा घरीच राहुन आपला रोजगार शोधण्याचा प्रयत्न करत असतील अशा महिलांना ‘पाथ अबँकस रोजगार निर्मिती साठी साह्य करत असते. म्हणून आपले भविष्य उज्वल करायचे असेल तर आपण पाथशी संपर्क करू शकता. संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 8668652360 . सुशिक्षित होतकरू महिलांना सुवर्ण संधी आहे. या संधिचे सोने करण्यासाठी आपण पाथ ला एकवेळ आवश्यक संपर्क करून साह्य घेऊ शकता.

*************************************
✒️लेेेकख:-विनोद पंजाबराव सदावर्ते
रा. आरेगांव ता. मेहकर
मोबा: ९१३०९७९३००
*************************************