झेड सुरक्षेतील सीईओ

  34

  ▪️अनुभव कथन

  मी गडचिरोली जिल्हा परिषद चा सीईओ असताना 2004मध्ये मला पहिल्यांदा य व लगेचच Z सुरक्षा देण्यात आली होती. माझे पुस्तक, “आणखी एक पाऊल” मध्ये “झेड सुरक्षितेतील सीईओ”हा लेख आहे. सुरक्षेचे कारण असे दिले होते की नक्सलवाद्यांकडून जीवाला धोका आहे. ह्याचे कारण सांगितले गेले की कलेक्टर व सीईओ याना5सांगून ही त्यांनी पोलीस अधीक्षक यांची बदली केली नाही. तसे पत्र नक्सलवाद्यांकडून कलेक्टर ,एसपी यांना पाठविण्यात आले होते. पोलिसांनी या पत्राची गंभीर दखल घेतली व Z सुरक्षा दिली. सीईओ चा बंगला ऑफिस येथे सुरक्षा, जेथे गेले तेथे सोबत पोलीस सुरक्षा. मला तर बंदीस्त झाल्यासारखे वाटायचे. मी Addl CS home यांना पत्र लिहिले होते की मला सुरक्षा नको, सीईओ म्हणून आदिवासी भागात मोकळेपणाने काम करता येणार नाही.

  एवढेच नव्हे तर नक्सल वाद्यांकडून पाठविलेल्या पत्राबाबत शंका उपस्थित करून ,ज्या कारणासाठी सुरक्षा दिली आहे, त्या कारणांची शहानिशा करावी अशी शासनास विनंती केली होती. पुढे, काहीच झाले नाही. दिं 8 मे 2004ला कलेक्टर सीईओ च्या बिनगुंडा दौऱ्यावेळी ,naxalite ने mine ब्लास्ट घडवून आणला होता .ही घटना ,”बिनगुंडा ब्लास्ट ” या लेखात आहे. मी रजेवर नागपूर ला असताना Z सुरक्षा होतीच. हे काढून टाका म्हणून ,मी स्वतः तीन पत्र आयुक्त SID याना लिहलीत तेव्हा ती काढून टाकण्यात आली. माझा अनुभव आणि म्हणणे असे आहे की सुरक्षा कर्मचारी तुमचा जीव वाचवू शकत नाही. “आणखी एक पाऊल” हे पुस्तक वाचले तर वास्तव कळेल.

  आता, हे लिहण्याचे कारण की राज्य सरकारने काही राजकीय नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात केली, किंव्हा काढली. यावरून सरकारवर नाराजी आणि आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. सुरक्षा पुरविण्याबाबत चा आढावा मुख्यसचिव समिती घेत असली तरी यात राजकीय कुरघोडी असू शकते. भारताच्या राजकीय लोकशाही व्यवस्थेत, लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधी ना खरं तर y+ z, z+, एस्कॉर्ट ची गरजच काय ? हे राजे महाराजे नाहीत, लोकप्रतिनिधी आहेत. लोककल्याणाचे ,चांगले काम इमाने इतबारे केले तर, लोकांकडून कसलाही धोका नाही. तसेही घडामोडीवर , पोलिस लक्ष ठेवून असतातच. मात्र, अतिरेकयांकडून जीवाला खरच धोका असेल तर त्यानुसार वयक्तिक सुरक्षा द्यावी. नेत्यांना ,अधिकाऱ्यांना ,सुरक्षा पुरविणे हा विषय प्रतिष्ठेचा व रूढी परंपरा , वर्चस्वाचा झाला आहे. गाडीवरील लाल दिवा हटविला , काय साध्य झाले? नेते मंडळी सर्वसामान्यासारखे जगले, सर्व समान्य लोकांना सहज भेटता आले, तर काही चांगला बदल दिसेल, अन्यथा नाही. हे माझे मत आहे.

  ✒️लेखक:-इ झेड खोब्रागडे.
  माजी सनदी अधिकारी
  मो.9923756900