गॅस कंपनीकडून एजन्सी ची डीलरशिप देण्याच्या नावाखाली तळोधी( खुर्द) येथील तरुणाची फसवणूक

26

🔺तरुणाला साडे तीन लाखावर गंडविले

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रह्मपुरी(दि.11जानेवारी):- तालुक्यातील तळोधी ( खुर्द) येथील एका तरुणाला भ्रमणध्वनीवर आलेल्या संदेशाद्वारे गॅस कंपनीकडून एजन्सी ची डीलरशिप देण्याच्या नावाखाली तीन लाख 50 हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली.ब्रह्मपुरी तालुक्यातील तळोधी खुर्द येथील रहिवासी आशिष गिरीधर खरवडे यांच्या भ्रमणध्वनीवर उज्वला गॅस एजन्सी डीलरशिप या नावाने ८ नोव्हेंबर २०२० ला संदेश आला त्यामध्ये उज्वला गॅस एजन्सी एजन्सी ची डीलरशिप घेण्याकरिता दिलेल्या संकेतस्थळावर अर्ज करण्याबाबत सांगितले त्या अनुषंगाने फिर्यादी आशिषने संकेत स्थळावर 9 नोव्हेंबरला संगणकाद्वारे अर्ज दाखल केला संकेत स्थळा द्वारे फिर्यादीच्या ई-मेल आयडी वर नोंदणी क्रमांक व पासवर्ड पाठविण्यात आले.

नोंदणी शुल्क म्हणून आठ हजार रुपये व ना हरकत प्रमाणपत्र शुल्क म्हणून पंचवीस हजार रुपये असे एकूण 33 हजार रुपये फिर्यादी कडून भरण्यात आले त्यानंतर कंपनीकडून फिर्यादीच्या भ्रमणध्वनीवर परत एजन्सीने टेक्स्ट मेसेज करीत तीन लाख वीस हजार रुपये पेटीएम बारकोड स्कॅन करून टप्प्याटप्प्याने 21 नोव्हेंबर 2020 पर्यंत एकूण तीन लाख 53 हजार रुपये भरण्यात आले कंपनीच्या भ्रमणध्वनी क्रमांकावरून उर्वरित रक्कम 4 लाख 80 हजार रुपये भरण्यास वारंवार सांगण्यात येत होते परंतु एजन्सी बाबत आशिषच्या मनात शंका निर्माण झाली फिर्यादीने इंडियन ऑइल कंपनीच्या नागपूर येथील क्षेत्रीय कार्यालयात भेट देऊन तेथील अधिकाऱ्यांना विचारपूस केली असता हे संकेतस्थळ खोटे असून एजन्सी देण्याची तरतूद नसल्याचे त्यांनी सांगितले यात आशिषची फसवणूक झाल्याचे त्यांनी सांगितले तसेच गुगल मॅप द्वारे उज्वला गॅस एजन्सी चा शोध घेतला असता एजन्सीचे कार्यालय अस्तित्वात नसल्याचे दिसून आले अज्ञात संकेतस्थळ धारक वापरकर्त्यांनी उज्वला गॅस कंपनीचा लोगो वापरून अशीच करण्याची लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध ब्रम्हपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.