विविध विकास कामचे नगरअध्यक्ष विजयकुमार तापडिया यांच्या हस्ते उद्घाटन

28

✒️अनिल सावळे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.11जानेवारी):- प्रभाग क्रमांक 8 मध्ये नगरअध्यक्ष विजयकुमार तापडिया यांनी विविध विकास कामाचे उद्घाटन केले या वेळी ते बोलत असताना मागील चार वर्षांत गंगाखेड मधील प्रत्येक प्रभागात विकास कामांना गती देऊन प्रत्येक काम विकासाच्या दृष्टीने होत गेले आणी हे वर्ष पण पुर्णपणे विकासाचे वर्षे असेल अशी ग्वाही नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया यांनी दिली.

प्रभाग क्रमांक 5 व 8 मध्ये विशेष रस्ता अनुदानातून डॉ. गारोळे यांचे घर ते मंगळुरकर यांचे घर देवळे जिनिंग मधील पेकम यांच्या घरा समोरील सिसी नाली व पेव्हरब्लॉक रसता खंडु यांच्या घरापासून ते मुख्य रस्त्याच्या पुला पर्यंत 95 लाखाच्या निधीतील तीन कामाच्या भुमिपुजनप्रसंगी ते बोलत होते.

या वेळी भाजपचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष डॉ सुभाष कदम, डॉ किशन गारोळे, डॉ अजय कुंडगीर, डॉ नितेश इदाते, डॉ सुनील तोष्णीवाल, माझी नगरसेवक प्रविण काबरा, डॉ चव्हाण, सोनेराव कतारे, प्रमोद साळवे, रमेश कातकडे, पिंटु जैन,बन्सी कांबळे, निलेश मेहता, अरविंद सर, कोठलवर मंगळुरकर व नगरीचे नगरसेवक चंद्रकांत रामराव खंदारे हे या वेळी उपस्थित होते