महिलांनी समाज कार्य करित असतांना राजकारण सुद्धा करावे – प्रज्ञा राजूरवाडे

  44

  ?राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्री माई फुले संयुक्त जयंती कार्यक्रम

  ✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

  चिमूर(दि.13जानेेवारी):-महिला जागृती विचार मंच यांच्या वतीने लुबिंनी नगर बौद्ध विहार वडाळा येथे राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्री माई फुले यांचा संयुक्त जयंती कार्यक्रम संपन्न झाला . प्रमूख वक्ते म्हणून प्रज्ञा राजूर वाडे , कल्पना महाकाळ कर , वंदना शेषकर व अध्यक्षा विद्या गणविर होत्या.

  वक्ते म्हणाले की शिक्षित महिलांनी समाजकार्य करित असतांना प्रभावी राजकारण सुध्दा करावे महिलांनी राजकारणा मंध्ये यायला पाहिजे त्या करिता प्रशिक्षण वर्ग घेण्याची इच्छा व्यक्त केली .महिला अजूनही खूप गोष्टी पासुन वंचित आहेत त्यांना योग्य प्रतिनिधित्व मिळत नाहीमहिलांचे जागृतीचे कार्यक्रम सतत व्हायला पाहिजे असा संकल्प केला.

  कार्यक्रमाचे संचालन पुष्पा राऊत व प्रास्ताविक विजया थुल व आभार झोडापे मॅडम यांनी केले . याकरिता महिला जागृती विचार मंचच्या ज्योती हुमने, कल्पना लोखंडे , वांसती झोडापे , कामीनी मेश्राम , वनमाला भैसारे पोर्णिमा बोरकर , ताक सांडे मॅडम, पिल्लेवान मॅडम , ढोक मॅडम , कोसे बाई, सुर्यवंशी मॅडम व इतर महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .