समाजसेवक धनाजी जोशी यांना युवा समाजसेवक सन्मान पत्र

30

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.13जानेवारी):-अर्धापूर जि.नांदेड येथे महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता युवा मोर्चा संकल्पीत युवा मोर्चा ग्रामीण आयोजित मा जिजाऊ साहेब स्वामी विवेकानंद सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने युवा सन्मान सोहळ्यात नांदेड जिल्हाचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते देगलूरचे समाजसेवक धनाजी जोशी यांना युवा समाजसेवक सन्मान पत्र देऊन गौरवण्यात आले.

यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर आमदार राम पाटील रातोळीकर जिल्हा संघटक सरचिटणीस गंगाधर जोशी साहेब गंगाधर ठक्करवार साहेब आयोजक तथा भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अंकुश देशमुख देगलूर भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष अशोक कांबळे उपाध्यक्ष सचिन कांबळे तसेच अनेक मित्र परिवार व खुप मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होते.