राजनगट्टा येथे राष्ट्रीय युवा दिन मोठ्या उत्साहात संपन्न

26

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

गडचिरोली(दि.13जानेवारी):-राष्ट्रीय युवा दिन, स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ जयंती चे औचित्य साधत नेहरू युवा केंद्र, गडचिरोली अंतर्गत छत्रपती शिवाजी युवा मंडळ राजनगट्टा व महिला मंडळ राजनगट्टा च्या वतीने जिजाऊ व विवेकानंदाना अभिवादन करण्यात आले. व उपस्थित युवकांना राष्ट्रीय युवा दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून गावातील प्रतिष्ठित नागरीक मा.पो.पा. भाऊजी चलाख, काशिनाथ चीचघरे, वसंत कोहळे, कविता कोहळे मंडळाचे अध्यक्ष उमेश भांडेकर, सचिव अनुप कोहळे, आदी महिला गावातील युवक व युवती उपस्थित होते.

आज शिवबा जन्मास यावे असे वाटत असेल तर प्रत्येक स्त्रीने फक्त नावाने नाही तर कर्माने परत एकदा जिजाऊ बनावे लागेल असे प्रतिपादन कविता कोहळे यांनी मार्गदर्शन करतांना केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुप कोहळे तर आभार उमेश भांडेकर यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन छत्रपती शिवाजी युवा मंडळ च्या वतीने करण्यात आले होते.