नागपूर विरान शांतीच्या भयचक्रात

जगाला नव क्रांतिची प्रेरणा देणारे परिवर्तनिय शहर नागपूर….
मौर्य काळातील फणिंद्रपूर..
नागवंशीय विज्ञानतत्वज्ञानाचे अनुबंध जोडणारी मानवभूमी.
धम्माला गतिमान करणारी क्रांतिभूमी…
मानवाला नव्या आत्मभानतेचा आविष्कार घडवणारी दीक्षाभूमी..
स्वतंत्र राज्यकारभाराची मुर्हतमेढ रोवणारी गोंडवानभूमी…
स्वातंत्र्यानंतर राजधानीचे वैभव प्राप्त झालेली राजभूमी…
मध्य प्रांतातील शुर सैनिकाची क्रांती छावनी..
तीनशे त्रेचाळीस वर्षापासून आंदोलनाचे मुख्य केंद्र,स्वातंत्र्यसंग्राम,सामाजिक संघर्ष,भोसल्यांच्या संग्राम,लाँगमार्च,शांतीमार्च,राजकिय खलबते,विद्यार्थी चळवळ, स्त्री चळवळ,शेतकरी कामगार आंदोलन,गोवारी स्वाभीमानाला आंदोलन,धम्मक्रांती, वाड्ःमयीन सृजनत्व,आंबेडकरवादी साहित्याचा ज्वालाग्राही अंगार अशा अनेक कार्याच्या नाममुद्रा कोरल्या आहेत…
सम्राट अशोककालीन कार्याचे प्रतिबिंबि शहरावर पडले आहेत..
सकल मानव कल्याणाचा मार्गदीपक ठरत आहे,
प्रतिक्रांती करणा-यासाठी कर्दनकाळ ठरला आहे…
बख्त बुलंदशाहाचे राजवैभवाच्या यशोगातेचा मुकूटमणी आहे..
नागवंशीय शुर सेनानी जाटबाचा महामेरू आहे..
सामाजिक व राजकिय चळवळीचे महाऊर्जा केंद्र असून,
स्वातंत्र्य,समता,व बंधुभावाचे मानव संविधान निर्माण करणारी कार्याशाळा आहे..
हजारोवर्षापासून समतेचे अशोक चक्र गतिमान करणारी नागभूमी आहे…
पण कोरोनाच्या लॉकडाऊनने आज विरान शांतीच्या भयचक्रात सापडली आहे..
निर्माणुष झालेले सारे पथ सुक्ष्मजीवाच्या दहशतीने बंदिस्त झाले आहे..
या शहराचे थांबने दुःखाचा डोंगर उभा करत आहे..
सक्करदराच्या ब्रिजवरून जातांना होणारी वाहनाची गर्दी गडप झाली आहे..
सारे शहर चार भिंतीच्या छताखाली बंदिस्त झाले आहे..
नव्या युगाच्या ऊर्जेचे क्षरण होत आहे..
सिताबर्डी,गणेशपेठ मेडिकल,सदर,महाल,गांधीबाग,ईत्यादी गजबजलेल्या भागात समशान शांतता आहे..
या नगरीचा आक्रोश मनाला कावराबावरा करतो आहे..
संत्रानगरीचा प्रवाह कधी स्टाँर्ट होईल हे सांगता येत नाही…
लॉकडाऊनचा सारा चलचित्रपट
चक्षुच्या रँटिनात इनस्टाँल करून ठेवला आहे..
उन्हांच्या प्रचंड ज्वाला काँमन मँनचे जीवन जाळीत आहे..
लोखंडी ब्रिजकडेला बसलेले मनोरूग्ण,गरीब,वंचित,भिकारी
दीनवाण्या नजरेने वाट पाहत आहेत.
सा-या खाण्यावळ्या,हॉटेल,दुकाने बंदने उध्दवस्त जीवनाचा स्वतंत्र तुरूंग बनवला आहे….
सहकार्य करणा-या समाजसेवकाचे,आरोग्य यंत्रणेचे,डॉक्टर,नर्स,पोलीस,वार्डबाय प्रशासकिय/राज्य अधिकारी,कर्मचारी हे क्रांतीयोध्दे नागपूरच्या पुर्नस्थापनेसाठी अहर्निश कष्ट घेत आहेत..
श्रमिकाच्या/कामगाराच्या दुःखावर मानवतेची फुंकर घालत आहेत…
आधुनिकिकरणाच्या नावाने
प्राचिन वैभवाचा सत्यानाश सुरू आहे…
भारतातील मध्य प्रांतातील झिरो मैल शेवटच्या घटका मोजत आहे.
खासगीकरणाच्या नावाखाली उत्तुंग इमारती नभासोबत स्पर्धा करीत आहेत…
पण , श्रीमंताची जवळच्या गरीब झोपडीकडे साधी नजरही जात नाही..
स्वतःचे रक्त आटवून शहराला प्रगतीच्या वाटेवर नेणा-या शोषितांचे जीवन लॉकडाऊनने उद्धवस्त केले आहे…
शोशल डिस्टन्सिंगने माणसाला माणसापासून दूर केले आहे..
धर्माधिष्टीत,जातत्थ,प्रतिगामी मुर्खांनी नागपूरला मागे ढकलण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
तरी नागपूर परिर्वतनाची क्रांतिभूमी आहे.
बुध्दाचा संदेश देणारा नवा पथ आहे.
हजारो मानवाला आपल्या कवेत घेणारा नवयान आहे.
पण आज विरान शांतीच्या भयचक्र चिरनिद्रा समाधीत उभा आहे.
पण यामधूच उत्तुंग भरारी घेणारा नवा फिनिक्स उदयास येणार आहे..

✒️संदिप गायकवाड(मो:-९६३७३५७४००)

नागपूर, महाराष्ट्र, विदर्भ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED