दयाभाई खराटे फाऊंडेशन तर्फे कर्तृत्ववानांचा पत्रकारिता गौरव, महाराष्ट्र गौरव,समाजगौरव पुरस्काराने सन्मान

30

✒️मलकापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मलकापूर(दि.13जानेवारी):-समाजरत्न दयाभाई खराटे यांच्या 12 व्या स्मृतिदिनानिमित्त महेश भवन,मलकापूर येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते तथा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार, पत्रकारिता गौरव, समाजगौरव, कलावंत सन्मान पुरस्कार समाजरत्न दयाभाई खराटे फाऊंडेशन मलकापूर द्वारा देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला दयाभाई खराटे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

अभिवादन सभेच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष एम.टी.इंगळे हे होते तर भन्ते महानाम,भन्ते मोग्गलायन यांच्या विशेष उपस्थितीसह मंचावर सभेचे निमंत्रक वंचित बहुजन आघाडी जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे, रामकृष्ण रजाने भारिप केंद्रीय सदस्य,विशाखाताई सावंग महिला जिल्हाध्यक्षा वंचित बहुजन आघाडी,शाहीर डी.आर.इंगळे,एस.एस.वले जी.कोषाध्यक्ष बौद्ध महासभा,वंचित बहुजन आघाडीचे जि.उपाध्यक्षा नगरसेविका प्रीतिताई शेगोकार,मा.जी.उपाध्यक्षा वर्षाताई इंगळे,जिल्हा संघटक भाऊराव उमाळे,जी.उपाध्यक्ष विजय तायडे,जी.सचिव तुळशीराम वाघ,महिला जी.महासचिव पुजाताई खेते, आयटी जिल्हाप्रमुख ऍड.रागिणी तायडे,जी.सदस्या लक्ष्मीताई मोरे,सामाजिक कार्यकर्त्या संघमित्राताई कस्तुरे,जेष्ठ नेते प्रा.एस.पी.हिवाळे,सामाजिक कार्यकर्त्या प्रमिलाताई इंगळे,बी.जी.तायडे सर,जेष्ठ पत्रकार नत्थुजी हिवराळे,उल्हासभाई शेगोकार,बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष निवृत्ती वानखेडे,आर.एम सूर्यवंशी,के.यु.बावस्कर, विश्वगामी पत्रकार संघटना जिल्हाध्यक्ष सतीश दांडगे,उषाताई पवार,सम्यक आघाडी जी.नेते सतीश गुरचवळे,संजय दाभाडे,विजय इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मान्यवरांनी दयाभाई खराटे यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला.कोरोना महामारीच्या काळात मानवतेच्या दृष्टीकोनातून आपल्या प्राणाची बाजी लावून विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व अविरत कार्य करणाऱ्या व्यक्तींची राष्ट्रभक्ती संपुर्ण महाराष्ट्राने अनुभवली,अश्या कोरोना योद्ध्यांच्या सन्मानार्थ समाजरत्न दयाभाई खराटे फाऊंडेशन मलकापूर वतीने “महाराष्ट्र गौरव पुरस्कार” वैद्यकीय क्षेत्रातून डॉ. जी.ओ.जाधव यांना, तसेच पत्रकारिता क्षेत्रातील महाराष्ट्र गौरव पुरस्कार जेष्ठ पत्रकार हरिभाऊ गोसावी याना व विद्युत वितरण क्षेत्रातील सहाय्यक अभियंता अमोल काळबांडे यांना प्रदान करण्यात आला.

याप्रसंगी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता जीवनगौरव पुरस्कार विरसिंह राजपूत संपादक मलकापूर आजतक, अशोक जसवानी संपादक खबरे शामतक, तुकारामजी रोकडे पत्रकार दै.सम्राट, तर पत्रकारिता गौरव पुरस्कार राजेश बाठे संपादक आर सी न्युज,अतुल होले ता.प्रतिनिधी पुण्यनगरी,विशाल पेटारे संपादक महाराष्ट्र जन्मभूमी, शैलेश वाकोडे संपादक दै. सत्यप्रतिमा, मिर्झा असीम बेग संपादक विदर्भ सिटीजन,शेषराव सोपाने संपादक जनतेचा बातमीदार,अमीन शहा संपादक पोलिसनामा,सागरकुमार झनके रिपोर्टर एम24 न्युज,शेख निस्सार ता प्रतिनिधी जळगाव उन्नती,नविल वाघ रिपोर्टर आयबी सेवन,किशोर इंगळे संपादक हॅलो महाराष्ट्र,पत्रकार दीपक अहिरे,देवेंद्र जैस्वाल बयांना प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वीयतेसाठी शांताराम सोनोने,विलास तायडे,संतोष इंगळे,यासिन कुरेशी,भीमराज मोरे,विलास भा.इंगळे,प्रकाश सोनोने,सुपडा ब्राम्हणे,अरुण खराटे,संजय खराटे,मुन्ना खराटे,मधुकर निकम,अजय निकम,प्रवीण के इंगळे,सुनील तायडे,प्रशांत बोदडे, अमोल थाटे, धनराज तायडे,सागर बोदडे,पँथर सेनेचे विजय इंगळे, राष्ट्रपाल सपकाळ,सुमित वाकोडे,आकाश सरदार,मुकेश वाकोडे यांनी परिश्रम घेतले.सभेचे सूत्रसंचालन ज्ञानदेव खराटे यांनी केले तर आभार निमंत्रक अतिशभाई खराटे यांनी मानले.