विविध मागण्यासाठी प्रजासत्ताक दिनी शिंदी बुद्रूक ग्रामस्थांचा सामूहिक आत्मदहन करणेचा इशारा

104
✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड-माण)मो:-9075686100

म्हसवड(दि.14जानेवारी):-बुद्रुवक,ता.माण,जि. सातारा येथील गट नंबर ६०० हि बौद्ध समाजाची सामायिक मिळकत असून या मिळकती वर काही अपप्रवृत्तीच्या लोकांनी अतिक्रमण केले असून ते मूळ मालकांच्या कब्जे वहिवाटीस अडथळा करीत आहेत. तसेच काहींनी महसुली अधिकारी याना हाताशी धरून आणेवारी जुळवित असतानां गैरप्रकार करून महसुली अभिलेख मध्ये अनेक चुकीचे बदल केले आहेत. या गट नंबर ६०० मधील ३ हेक्टर क्षेत्र “तुपेवाडी लघुपाटबंधारे योजना ” यासाठी अधिग्रहण होऊन कोणत्या हि प्रकारचा मोबदला मिळाला नाही.या संपूर्ण गैरप्रकार बाबत सर्व कागदोपत्री पुरावे सादर करून मा.तहसीलदारसो. दहिवडी तसेच मा.उपविभागीय अधिकारी दहिवडी यांना अनेक वेळा सनदशीर मार्गाने लेखी अर्ज करून दाद मागितली होती परंतु प्रशासनाने यावर आज अखेर कोणतीच ठोस कारवाई केली नाही.

यामुळे सर्व खातेदारांचे प्रचंड नुकसान होत आहे.या प्रश्नी दोन वर्ष पूर्वी तहसील कार्यालय दहिवडी येथे धरणे आंदोलन केले होते यावर प्रशासनाने गट नंबर ६०० मधील अतिक्रमण हटवून प्रकल्प ग्रस्तांना मोबदला मिळवून देण्याचे लेखी आश्वासन दिले होते. परंतु आज दोन वर्ष उलटून सुद्धा कोणतीही कार्यवाही झाली नसलेने सर्व खातेदारांनी येत्या प्रजासत्ताक दिनी सामुदायिक आत्मदहन करणेचा इशारा मा. उपविभागीय अधिकारी सो दहिवडी याना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.यांच्या प्रति तहसीलदार दहिवडी , पोलीस स्टेशन दहिवडी याना देण्यात आल्या आहेत.निवेदन देताना संदीप खरात (राजप) अनुसया झेंडे, शशिकांत खरात, भास्कर खरात, आबू खरात ,संजय खरात आदी उपस्तिथ होते.