एक मंच एक विचार” ही संकल्पना राबवत फलटण येथे नामविस्तार दिन मोठ्या उत्साहात साजरा

39

✒️नितीन राजे(खटाव,जिल्हा सातारा- विशेष प्रतिनिधी)मो:-9822800812

सातारा(दि.15जानेवारी):- दलित पँथरच्या चळवळीने राजा ढाले, नामदेव ढसाळ, अरुण कांबळे, ज. वि. पवार, रामदास आठवले, गंगाधर गाडे असे अनेक धडाडीचे आणि झुंझार नेते महाराष्ट्राला दिले. तद्वत नामांतर लढ्याने मराठवाडाभर नेते आणि कार्यकर्त्यांचे मोहोळ उठवले. कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी केली होती.एका गटाने अस्मितेची लढाई लढली, तर दुसऱ्याने नामांतर जीवन मरणाचा प्रश्न करून टाकला होता. शेवटी एका विद्यापीठाची फाळणी झाली. एकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद तर दुसऱ्याला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड अशी विस्तारित नावं दिली गेली. तो नामविस्तार दिन (१४ जानेवारी) म्हणून मोठ्या उत्साहाने औरंगाबाद येथे साजरा केला जातो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हा नामांतर दिवस पण या नामांतराच्या दिवसाची वाट पाहण्यासाठी  आंबेडकरवादी जनतेला १७ वर्ष संघर्ष करावा लागला होता.

नामांतराचा लढा हा केवळ विद्यापीठाची पाटी बदलणारा नव्हता, तर तो समता, स्वातंत्र्य, बंधूभाव पुढे नेणारा लढा होता. विद्यापीठाचं नामांतर हे केवळ आंदोलन नव्हतं, तर त्याला सामाजिक लढ्याचे स्वरुप आलं होतं. नामांतराची लढाई हि प्रतीकात्मक सामाजिक समतेची लढाई होती. १४ जानेवारी १९९४ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रवेशद्वार हे आंबेडकरी समाजाचे प्रेरणास्थान बनले आहे. दरवर्षी १४ जानेवारी यादिवशी आंबेडकरी जनता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठच्या ‘ प्रवेशद्वाराची ’ची मनोभावे पूजा करते. जणूकाही साक्षात आपण बाबासाहेबांपुढेच नतमस्तक होत आहोत या श्रेद्धेने गेटपुढे नतमस्तक होतात.

फलटण येथे “एक मंच एक विचार” ही संकल्पना राबवत भिमजयंती उत्सव समिती तसेच दलित पँथरने आंबेडकर चौक येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून नामविस्तार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी दलित चळवळीतील जेष्ठ नेते वसंतदादा निकाळजे, मोहन अहिवळे, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती २०२१ महोत्सव समिती फलटणचे अध्यक्ष शाम अहिवळे, दलित पँथरचे सातारा जिल्हाध्यक्ष रोहित अहिवळे, सातारा जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण काकडे, देवीदास जगताप, फलटण तालुका अध्यक्ष मंगेश आवळे, फलटण तालुका कार्याध्यक्ष रोहित.य.अहिवळे, फलटण शहर अध्यक्ष आकाश काकडे, फलटण तालुका उपाध्यक्ष सिध्दार्थ सावंत तसेच कार्यकते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.