रंजाणे गावी झाला मतदार यादीत घोळ

27

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

शिंदखेडा(दि.15जानेवारी):- दि.15 जानेवारी 2021 रोजी रंजाणे तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे येथील ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून त्या ठिकाणी नागरिकांनी व निवडणूकीत उभे असलेले उमेदवार यांच्यासह ग्रामस्थ सकाळी 15 जानेवारी 2021 रोजी ज्यावेळी निवडणूक केंद्रावर गेले असता त्यांच्या असे निदर्शनात आले की निवडणुकीच्या मतदार याद्या पाहिल्या असता त्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात याद्यांमधील संख्येमध्ये, नावांमध्ये तफावत आढळून आली. परंतु आज मिळालेल्या याद्या व 10 डिसेंबर 2021रोजी राज्य निवडणूक निर्णय अधिकारी यांनी व ग्रामपंचायत रंजाणे कार्यालयात नियोजित कार्यक्रमानुसार प्रसिद्ध केलेली अंतिम मतदार यादी यात मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आली आहे.

प्राप्त यादी नुसारच आमच्या उमेदवारांची आवेदनपत्र दाखल केली होती व त्या नुसारच प्रचार, भेटीघाटी करणे सुरू झाले होते व त्यानुसारच उमेदवार आपापल्या पद्धतीने गावात प्रचार करीत होते परंतु 15 जानेवारी 2021 रोजी सकाळी निवडणूक मतदान केंद्रावर उमेदवार गेले असता त्यांना असे निदर्शनात आले की 10 डिसेंबर 2021 रोजी अंतिम मतदार यादी व मतदानाच्या दिवशी कायम न ठेवता वेगळीच यादी दिसून आल्याने मोठ्या प्रमाणात या याद्यांमध्ये तफावत आढळून आलेली आहे.रंजाणे ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये बूथ केंद्राध्यक्षांकडे उपलब्ध असलेली यादी प्रमाणेच मतदान प्रक्रिया सुरू आहे पण उमेदवारांना दिनांक 10 जानेवारी 2021रोजी शिंदखेडा तालुका निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्या यादीत आणि आज तारखेचे मिळालेल्या यादीत मध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत आढळून आल्याने संपूर्ण उमेदवार व ग्रामस्थांच्या वतीने राज्य निवडणूक आयोग यांच्याकडे तक्रार तसेच ई-मेल ने तक्रार दाखल केली.

असून व प्रांताधिकारी शिंदखेडा व तहसीलदार शिंदखेडा यांच्याकडे देखील तक्रार दाखल करण्यात आली आहे पण यात चूक कोणाची असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडत असून यात ग्रामस्थ उभे असलेले उमेदवार आणि निवडून येणारे उमेदवार यांच्यामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून या गंभीर चुकीमुळे उमेदवार निवडून येण्याची शाश्वती कमी झाली व आजच्या निवडणुकीत उमेदवारांना होणाऱ्या नुकसानीस जबाबदार कोण असा देखील प्रश्न या ग्रामस्थांना उभा टाकला आहे यात प्रदीप पाटील मन्साराम शिरसाट महेंद्र गिरासे सतीश मिशी रवींद्र तवर जगन्नाथ ढोले मनोहर वाडीले सुधाकर ईशी रामचंद्र वाडीले मुकेश ढोले आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.