राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई मागील वर्षेभरात दोन कोटींचा मुद्देमाल जप्त

23

🔺1351 गुन्ह्यांची नोंद, 553 आरोपींना अटक

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

जळगाव(दि.15जानेवारी):- राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने मागील वर्षेभरात जानेवारी ते डिसेंबर 2020 या कालावधीत अवैध मद्य विक्री विरोधात राबविण्यात आलेल्या धडक कारवाईत एक कोटी अठ्याण्णव लाख एकोणतीस हजार एकतीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अशी माहिती सीमा झावरे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, जळगाव यांनी दिली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने या कालावधीत एकूण 1351 गुन्हे नोंदविलेले असुन यामध्ये वारस-539, बेवारस-812 गुन्हे दाखल करण्यात आले असून यात 553 आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये मोहाफुले-100 किलो, हातभट्टी दारु 18173 लि, देशी मद्य- 1103.09 ब.लि., विदेशी मद्य-1807.3 ब.लि., बीअर 109.29 ब.लि. तसेच बनावट देशी मद्य-423.36 ब.लि. बनावट विदेशी मद्य-25.9 ब.लि., परराज्यातील मद्य-9.75 ब.लि., बनावट ताडी 561 लिटरचा समावेश आहे.

यात 55 दुचाकी व 6 चारचाकी वाहनांचाही समावेश असून वर्षेभरात 1 कोटी 98 लाख 29 हजार 31 इतक्या रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ग्रामपंचायत निवडणूक काळात 34 गुन्ह्यांची नोंद तर 19 आरोपींना अटकबत्याचबरोबर जिल्ह्यात सुरु असलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या काळातही विभागाने 1 ते 13 जानेवारी, 2021 या 13 दिवसांमध्ये एकूण 34 गुन्हे नोंदविले असुन यात वारस-14, बेवारस-20 गुन्हे दाखल करण्यात आले असुन यामध्ये एकूण 19 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर हातभट्टी दारु-511 लि, देशी मद्य- 7.74 ब.लि., बीअर 1.95 ब.लि., तसेच बनावट विदेशी मद्याच्या एम्पेरीयल ब्यु व्हीस्कीच्या 180 मि.ली. च्या 500 सिलबंद बाटल्या, विदेशी मद्याचा तयार ब्लेंड, बुचे रिकाम्या बाटल्या, 3 दुचाकी वाहने, 1 (टाटा सुमो) चारचाकी वाहन असा एकुण 15 लाख 74 हजार 627 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

शिवाय या कालावधीत वरील गुन्ह्यांपैकी एकुण 3 गुन्हात्म गुन्हे नोंदविण्यात आले असुन यामध्ये तीन बनावट दारुचे कारखाने उध्दवस्त करण्यात आले आहे. या गुन्ह्यातील कारवाईत बनावट विदेशी मद्य तयार करण्याकरीता लागणारे साहित्य स्पीरीट, 3 बॉटलींग मशिन, हायड्रोमिटर, विदेशी मद्याचा तयार ब्लेंड, बुचे रिकाम्या बाटल्या व तसेच मद्यार्क-350ब. लि., बनावट देशी/ विदेशी मद्य 850 ब.लि, एक दुचाकी वाहन व तीन चार चाकीवाहने असा एकुण 20 लाख 61 हजार 991 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.जिल्ह्यात हातभट्टी व अवैध मळी/मद्य/मद्यार्क याची निर्मिती, विक्री, वाहतुक, आयात, निर्यात, खरेदी व बाळगणे महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत अजामीनपात्र गुन्हा असुन किमान 3 ते 5 वर्ष कारावास किंवा 25 ते 50 हजार रुपयांचा दंड किंवा दोन्ही इतक्या शिक्षेची तरतुद आहे.

अशा बेकायदेशीर व्यवसायीची माहिती देणा-या इसमांचे नाव गोपनीय ठेवण्यात येते व शासनाने विहित केल्यानुसार खबरीस भरीव बक्षीस देण्यात येईल. याकरीता विभागाने संपर्क क्रमांक, विभागाचा व्हॉटसॲप क्रमांक, टोल फ्री क्रमांक ई-मेल आयडी इत्यादी माहिती असलेले जाहिर सुचनेचे फलक जिल्ह्यातील प्रत्येक गावांमध्ये लावले असून सीमावर्ती भागातील छोट्या गावांमधून राज्यात येणारे रस्ते किंवा खुशकीच्या मार्गावरुन महाराष्ट्र राज्यात परराज्यातील अवैध मळी / मद्यार्क / मद्याची वाहतुकीस आळा बसविणे कामी व अशा अवैध धंद्याची माहिती मिळविण्यासाठी सीमावर्ती भागातील स्थानिक लोकांमध्ये जनजागृती करुन सहभाग वाढवण्याकरीता त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व सीमा तपासणी नाके, गांवामधून राज्यात येणारे रस्ते व खुशकीच्या मार्गावर जाहीर सुचनाचे फलकही लावण्यात आल्याचे श्रीमती झावरे यांनी कळविले आहे.

ग्रामपंचायत निवडणूकीत अवैध मद्य विक्रीवर आळा बसण्यासाठी विशेष भरारी पथकाची नियुक्ती
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिलेल्या आदेश व सुचनांप्रमाणे तसेच कांतीलाल उमाप, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई, श्रीमती उषा वर्मा, संचालक, (अंमलबाजवणी व दक्षता) राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई, श्री. अर्जुन ओहोळ, विभागीय उप आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, नाशिक विभाग, नाशिक यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार जळगांव जिल्ह्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभाग, जळगांव कार्यालयाकडुन अवैध मद्य विक्रीवर आळा बसण्यासाठी जिल्ह्यात एक विशेष भरारी पथक व इतर पाच पथके यांचेकडुन अवैध मद्य विक्री विरुध्द कठोर कारवाई करण्यात येत असल्याचेही श्रीमती झावरे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.