कौटुंबिक न्यायालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा

24

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)मो:-9561905573

बुलढाणा(दि.15जानेवारी):-कौटुंबिक न्यायालय येथे 14 ते 28 जानेवारी दरम्यान साजरा केल्या जाणारा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी न्यायाधीश अशोक ढुमणे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख पतसंस्थेचे व्यवस्थापक गजानन राऊत, न्यायालयाचे समुपदेशक जगन्नाथ कांबळे उपस्थित होते.

यावेळी न्यायाधीश श्री. ढुमणे यांनी न्यायालयात येणाऱ्य पक्षकारांना मराठी भाषेत न्यायालयाचे कामकाज समजण्यासाठी न्याय निर्णय मराठी भाषेत देण्यात येत असल्याचे सांगितले.अन्य मान्यवरांनी मराठी भाषेच्या वापराविषयी मार्गदर्शन केले. यावेळी कोविड 19 मार्गदर्शक सुचनांचे पालन करण्यात आले. कार्यक्रमासाठी पक्षकार, विधीज्ञ एन. बी साखरे, प्रबंधक डी. सी तोमर, एस एम पिंगळे, एस व्ही मानकर, पी. डी पंडीत, पी. जी भागवत, शेख असलम व पी. डी तायडे उपस्थित होते. संचलन एलएन मोहरीर यांनी केले.