दिनदर्शिकेच्या माध्यमातून भटा-बामनांनी मूलनिवासी बहुजन समाजावर सांस्कृतीक गुलामगिरी लादली – डी. आर. ओहोळ

31

✒️पूणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पूणे(दि.16जानेवारी):-“दिनदर्शिकेच्या माध्यमातून भट-ब्राम्हणांनी मूलनिवासी बहुजन समाजावर सांस्कृतीक गुलामगिरी लादली.भारत मुक्ती मोर्चा बहुजनांना ब्राम्हणी गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी आहे तर स्वराज्याचा जाहीरनामा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या जाहीरनामा आहे.” असे मत बामसेफ चे राष्ट्रीय महासचिव मा. डी. आर. ओहोळ सर यांनी व्यक्त केले.राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन स्वराज्याचा जाहीरनामा आणि भारत मुक्ती मोर्चा या दिनदर्शिकांचे प्रकाशन मा. डी. आर. ओहोळ सर यांच्या हस्ते बामसेफ भवन पुणे येथे करण्यात आले,याप्रसंगी त्यांनी बहुजन दिनदर्शिकेचा इतिहास सांगितला.तसेच “मूलनिवासी बहुजनांनी आपल्या प्रत्येक दिवसाची सुरुवात ही आपल्या मूलनिवासी बहुजन महापुरुष,महामाता आणि संताच्या कार्याचे स्मरण करुन करावी.” असे आवाहन केले.

“बहुजनांना मानसिक, सांस्कृतिक तसेच धार्मिक गुलाम बनविणाऱ्या दिनदर्शिकांना पर्याय म्हणून बहुजनांचे प्रबोधन करुन सत्य इतिहास सांगणाऱ्या भारत मुक्ती मोर्चा आणि स्वराज्याचा जाहीरनामा या दिनदर्शिकांचे प्रकाशन होत आहे.” असे मत MN TV चे उपसंपादक रवींद्र राणे यांनी व्यक्त केले.
“स्वराज्याचा जाहीरनामा ची निर्मिती ही बामसेफ या विश्वविद्यालयातून झाली असून बहुजन समाजाला आपले खरे सण,उत्सव,महोत्सव तसेच दुःखद घटनाःचा इतिहास समजावा या उद्देशाने स्वराज्याचा जाहीरनामा च्या दिनदर्शिकेची निर्मिती करण्यात आली आहे.” असे मत सा. स्वराज्याचा जाहीरनामा चे मुख्य संपादक विशाल धेंडे यांनी प्रास्ताविक करताना व्यक्त केले.

“स्वराज्याचा जाहीरनामा ची लेखणी ही तलवारी सारखी धारदार असून बहुजनांचे प्रबोधन करणारी तर भटा-ब्राम्हणांच्या उरात धडकी भरवणारी आहे.” असा गौरव करीत भारत मुक्ती मोर्चाचे पुणे जिल्हा अध्यक्ष श्रीकांत होवाळ यांनी सदिच्छा दिल्या.याप्रसंगी सत्यशोधक वारकरी संघाचे महा. राज्य उपाध्यक्ष सुरेश भालेराव,डाॅ. अनिलकुमार माने (राष्ट्रीय युवा अध्यक्ष-बहुजन मुक्ती पार्टी),सुरेश गायकवाड (कार्य. संपादक-स्वराज्याचा जाहीरनामा),नाथाभाई वाढेल (व्यवस्थापक-बामसेफ भवन),बाळासाहेब साळवे (सहप्रभारी-MPT),विनोद शिंदे (प्रसिद्धी प्रमुख-स्वराज्याचा जाहीरनामा),प्रल्हाद खरात (BIN -राज्य कार्यकारिणी सदस्य),बाळासाहेब राखपसरे (पुणे जिल्हा अध्यक्ष-लहुजी क्रांती मोर्चा),गणेश गोरे (पुणे जिल्हा प्रतिनिधी-स्वराज्याचा जाहीरनामा),पत्रकार हर्षद रुपवते (कार्यकर्ते-बामसेफ),चंद्रकांत गायकवाड,इंदूताई भोसले,रेखा धेंडे इत्यादी बहुजन प्रकाशन समारंभास उपस्थित होते.

“स्वराज्याचा जाहीरनामा नेहमीच बामसेफ तसेच ऑफशुट विग्स च्या बातम्या अग्रक्रमाने प्रसिद्धी देत असतो.तसेच हा मीडिया व्यावसायिक नसून सामाजिक असल्यामुळे जाहीराती,बातम्या छापताना विचारधारा,ध्येय,उद्देश,तत्व याच्याशी प्रामाणिक आणि ईमानदार राहून कर्तव्य आणि जबाबदारी पार पाडत आहे.” असे मत कार्यक्रमाचे सूत्रसंचालक बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क चे महा. राज्य उपाध्यक्ष प्रा. बाळासाहेब धावारे सर यांनी व्यक्त केले.तसेच आभार प्रदर्शन स्वराज्याचा जाहीरनामा चे उपसंपादक संभु कांबळे यांनी केले.