ग्रामसभेच्या आयोजनास शासनाची परवानगी

27

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)मो:-9561905573

मुंबई(दि.16जानेवारी):- महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम ( १ ९ ५ ९ चा मुंबई अधिनियम क्र . ३ ) च्या कलम ७ नुसार प्रत्येक वित्तीय वर्षात निदान चार ग्रामसभांचे आयोजन बंधनकारक आहे अशाप्रकारे ग्रामसभेचे आयोजन न केल्यास संबंधित सरपंच , उपसरपंच , आणि ग्रामसेवक यांना जबाबदार धरून त्यांच्या विरुद्ध कार्यवाही करणेची तरतूद आहे .. कोरोना विषाणूच्या प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी शासन आदेश , अधिसूचना निर्गमित केल्या आहेत . या शासन आदेशानुसार सर्व प्रकारच्या सामाजिक , राजकीय सभा व संमेलनांवर बंदी घालण्यात आली होती . सदर आदेश व कोविड -१ ९ या संसर्गजन्य आजारामुळे असणारी आपत्कालीन स्थिती लक्षात घेता ग्रामसभेमध्ये असणारी ग्रामस्थांची उपस्थिती व त्यामुळे होणारी गर्दी ही आजाराच्या प्रार्दुभावाच्या दृष्टीने योग्य नाह.

हि बाब विचारात घेता , संदर्भाधीन शासन परिपत्रकान्वये , ग्रामसभा घेण्यास तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती देण्यात आली होती . सद्यस्थितीत कोविडच्या अनुषंगाने लॉकडाऊन काळातील निबंधांमध्ये शिथिलता येत असून बहुतांश जनजीवन पूर्ववत होत असल्याने , संदर्भाधीन शासन परिपत्रकान्वये ग्रामसभांच्या आयोजनास देण्यात आलेली स्थगिती उठविण्याबाबत निर्देश देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती . शासन परिपत्रक : कोविड -१ ९ या आजाराचे संक्रमण झपाट्याने वाढत असल्या कारणाने , गर्दी टाळण्याच्या दृष्टीने सामाजिक व सामुदायिक कार्यक्रमास प्रतिबंध करणारी नियमावली वेळोवेळी आरोग्य विभागाने तसेच केंद्र व राज्य शासनाने शासन आदेश काढून निर्गमित केली होती.

आदेशांना अनुसरून विभागाने संदर्भाधीन शासन परिपत्रकान्वये , महाराष्ट्र ग्रामपंचायत : ( १ ९ ५ ९ चा मुंबई अधिनियम क्र .३ ) च्या कलम ७ नुसार , ग्रामसभा घेण्यास पुढील आदेश तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती दिली होती . आता , कोविडच्या अनुषंगाने लॉकडाऊन काळातील निबंधांमध्ये शिथिलता येत जनजीवन सुरळीत व पूर्वपदावर येत आहे . त्यामुळ सदर बाब विचारात घेता , तसेच , ग्राम विकासात ग्रामपंचायतीच्या ग्रामसभांना असलेले अनन्य साधारण महत्व लक्षात घेता ग्रामसभांचे पर्वीप्रमाणे घेण्यास आज पासुन शासनाचे परवानगी दिली आहे