70 वर्षाच्या आजीच्या मदतीला धावले रयत शेतकरी संघटनेचे गेवराई तालुका अध्यक्ष बाळासाहेब जाधव

27

✒️नवनाथ आडे(गेवराई,तालुका प्रतिनिधी)मो:-9075913114

गेवराई(दि.16जानेवारी):-एक ७० वर्षाच्या आजीचा पाय घसरून पडल्याने कंबरामध्ये हाडूक सटकला होतो. परंतु आजी खूप गरिब प्रस्थितीमधल्या आहेत. गेवराई चे तालुका अध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी आज १०८ बोलवून त्या जिल्हा रुग्णालय येथे दाखल केले आहे.. रूग्णाच्या मदतीसाठी धावून आले बाळराजे जाधव समाज सेवक म्हणून बाळासाहेब जाधव हे नाव चर्चेत आहे.

प्रदेश सरचिटणीस सुनील ठोसर पाटील यांना फोन वर बातमी मिळताच सर्वोतोपरी सहकार्य केले आहे आणि सामान्य माणसाच्या मदतीसाठी काही वेळातच डॉक्टरांनी उपचार सुरू करण्यात आला आहे. जिल्हा रुग्णालय बीड येथे नातेवाईकांच्या मनाला धिर घालून त्यांच्या ताब्यात देऊन जाधव हे परतले आहेत. त्या आजी पडलेल्या आज ३ दिवस आहे वेळ पण तिथे शेकडो लोक उघड्या डोळ्यांनी पाहिलं पण कुणीही समोर आले नाही.

आणि बोलायला पण तयार नव्हते.. आजीच्या मदतीला कुणीही जात नव्हते.. सर्वाच्या साक्षीने एका सामान्य माणसाला जीवनाला दीर्घायुष्य लाभो यासाठी देवाकडे प्रथना केले.. व शेवटच्या माणसापर्यंत हाच आमचा धर्म मानतो… आरोग्य विभागात उपचार सुरू असताना सुचना करून काही अडचण आल्यास मला सविस्तर माहिती कळवा असे देखील जाधव यांनी म्हटले..गोरगरीबांना देवदूत सुनिल ठोसर यांच्या मार्गदर्शनाखाली मिळाला न्याय..