वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठाणच्या डायरी दिनदर्शिकेचे प्रकाशन

29

✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमूर(दि.16जानेवारी):- वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठाणच्या डायरी दिनदर्शिका २०२१ चा प्रकाशन समारंभ संपन्न झाला.समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अर्जून रामटेके होते.प्रमुख अतिथी म्हणून चिमूर प्रेस असोशिएशनचे अध्यक्ष चुन्नीलाल कुडवे,वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठाणचे अध्यक्ष ॲड.भूपेशकुमार पाटील,धनराज गेडाम,रविंद्र उरकुडे,रावन शेरकुरे,नरेश पिल्लेवान उपस्थित होते.पाहुण्यांचे हस्ते डायरी दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.

सामाजिक क्षेत्रात कार्य करणा-या प्रतिष्ठाणचे डायरी दिनदर्शिका हा स्तुत्य उपक्रम असल्याचे याप्रसंगी प्रेस असोशिएशन अध्यक्ष चुन्नीलाल कुडवे यांनी प्रतिपादन केले.

परिसरात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक,साहित्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठाणतर्फे मागील अनेक वर्षांपासून दिनदर्शिका वितरित करण्यात येत असते.यावर्षी प्रतिष्ठाणतर्फे डायरी स्वरुपातील आकर्षक दिनदर्शिका बनवण्यात आली.

प्रकाशन समारंभाचे संचालन प्रतिष्ठानचे सचिव सुरेश डांगे यांनी केले.प्रास्ताविक प्रतिष्ठाणचे अध्यक्ष ॲड.भूपेशकुमार पाटील यांनी केले.आभारप्रदर्शन रावन शेरकुरे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नितीन पाटील,मनोज राऊत,विनोद सोरदे,भाग्यवान नंदेश्वर,अमोल भिलकर,शैलेश रामटेके,सुधीर रामटेके,प्रणय मेश्राम यांनी प्रयत्न केले.