गंगाखेड विधानसभा मतदार संघातील पूल व रस्त्यांचे विकास कामासाठी आ.रत्नाकर गुट्टे यांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची घेतली भेट

28

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.16जानेवारी):-केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत विधानसभा मतदारसंघातील पूल व रस्त्यांची कामे करण्यासंदर्भात आज आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी केंद्रीय भूपृष्ठ व परिवहन मंत्री नितिन गडकरी यांची नागपूर येथे भेट घेऊन कामासंदर्भात मागणी केली.गंगाखेड विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागातील पूल व रस्त्यांचे विकासकामे करणे बाकी असल्याने संबंधित रस्त्यावरून दळणवळण करताना विद्यार्थ्यांसह नागरिकांचे अतोनात हाल होत असत. पावसाळ्यात पूल व रस्ता वाहून गेल्याने दळणवळण करताना सर्वसामान्यांना गावकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असे.

त्यामुळे आ. डॉ. गुट्टे यांनी गावकर्‍यांची ही समस्या लक्षात घेऊन केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत पूर्णा तालुक्यातील पूर्णा हयातनगर रस्ता प्रजिमा 11 रस्त्याची पुल मो-यासह सुधारणा करणे 450 लक्ष, नावकी आहेरवाडी रिजोरा प्रजिमा 10 रस्त्याची पुल मोऱ्यासह सुधारणा करणे 450 लक्ष, धनगरटाकळी गंगाजीबापु लिखा सोन्ना पिंपरण प्रजिमा 12 रस्त्याची पूल मोऱ्यासह सुधारणा करणे 1500 लक्ष व गंगाखेड तालुक्यातील इसाद राणीसावरगाव ते जिल्हा हद्द रामा 254 रस्त्याची 00/00 ते 10/00 पुल मो-यासह सुधारणा करणे 1500 लक्ष रुपये तसेच पालम तालुक्यातील पालम सोमेश्वर जांभूळबेट रस्त्यावर किमी 0/600 मध्ये लहान पुलाचे बांधकाम करणे 380 लक्ष, पुयणी गावाजवळ इजिमा 7 वर 2/500 मध्ये पुलाचे बांधकाम करणे 380 लक्ष, पेठपिंपळगाव ते तांबुळगाव मुदखेड सिपेगाव ते जिल्हा हद्द ग्रामा 37 वर पुलाचे बांधकाम करणे 284 लक्ष व पूर्णा तालुक्यातील चुडावा पांढरी सोनखेड ग्रामा 16 रस्त्यावर किमी 1/100 जवळ लहान पुलाचे बांधकाम करणे 190 लक्ष रुपये. गंगाखेड, अकोली, कोद्री ते लातूर जिल्हा हद्द मार्गाची सुधारणा करणे रामा 234 किमी 0/0 ते 30/0 , 130.50 कोटी रुपयांची मागणी केली आहे.

केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील गंगाखेड पालम व पूर्णा तालुक्यातील पूल व रस्त्यांच्या विकास कामाकरिता 181.84 कोटी रुपयांची आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे मागणी केली आहे. आ.गुट्टे यांच्या प्रयत्नाने या रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागुन दळणवळण करणे सोयीचे होणार आहे.