सज्जन सुभाष सुजलेगावकर यांची राज्यस्तरीय आदर्श युवा पुरस्कारासाठी निवड

25

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.17जानेवारी):-मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई तर्फे आयोजित राज्यस्तरीय गुणिजन गौरव महापरिषद २०२१ तर्फे कला, क्रीडा, साहित्य व संशोधन आदी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या तरुणांना वा संस्थेस राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात येतो.यंदा सन २०२१ यावर्षीचा देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे मानकरी म्हणून नांदेड जिल्ह्यातील, नायगाव तालुका, सुजलेगाव चे सुपुत्र सज्जन सुभाष भिमराव यांना यंदाचा मानाचा राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल क्रीडारत्न पुरस्कार २०२१ जाहीर करण्यात आला.

सज्जन सुभाष च्या क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक व इतर क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई व गुणिजन गौरव महापरिषद पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष अॅड. कृष्णाजी जगदाळे साहेब यांनी त्यांच्या नावाची निवड केली.

लवकरच पुरस्कार वितरण समितीमार्फत पुणे येथे दि.३० मे २०२१ रोजी पुरस्कार सोहळा आयोजित केला आहे. पुरस्काराचे स्वरूप आकर्षक सन्मानचिन्ह, लक्षवेधी गौरवपत्र, विशेष महावस्त्र, खास मानपत्र, मानकरी बॅच व मानाचा फेटा असे असून नामवंत पाहुण्यांच्या प्रमुख उपस्थिती पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. सज्जन सुभाष भिमराव यांना राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल क्रीडारत्न पुरस्कार २०२१ मिळाल्याबद्दल समाजातील विविध स्तरांसह मित्रपरिवार व गावकऱ्यांकडून कौतुक केले जात आहे…