सरपंच सेवा संघ राज्यभर स्वच्छ आणि सुंदर आदर्श गावे निर्माण करणार – पावसे पाटील

28

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.17जानेवारी):-संपुर्ण महाराष्ट्रात सरपंचांच्या न्याय हक्कासाठी कार्यरत असलेली राज्यातील एकमेव सरपंच संघटना आहे या संघटनेच्या वतीने राज्यातील काही गावे दत्तक घेऊन वेगवेगळ्या तालुक्यातील गांवे आदर्श करण्यासाठी सरपंच सेवा संघ कटीबद्ध आहे असे प्रतिपादन सरपंच सेवा संघाचे युवानेतृत्व संस्थापक बाबासाहेब पावसे यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे. पुढील काळात बाबासाहेब पावसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर 100 आदर्श गावे निर्माण करण्याचा संकल्प केला आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील काही गावांमध्ये शुभारंभ आदर्श निवड समितीचे प्रकल्पाचे प्रमुख जगदिश एन पाचभाई चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

सरपंच सेवा संघ राज्यभर पहील्या टप्प्यात १०० गांवे दत्तक घेऊन वेगवेगळ्या योजना राबविण्यासाठी ग्रामिण विकास ग्रामीण भागात वेगवेगळ्या प्रकारच्या योजनेची माहिती सर्व सामान्य माणसाला स्वच्छ आणि सुंदर गांव कसे असावे याची जन जागृती अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे यासाठी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य विभागीय कार्याकारणी जिल्हा कार्यकारिणी तालुका कार्यकारिणी सदस्यांच्या माध्यमातून कार्य करणार आहे असे श्री पाचभाई यांनी व्यक्त केले या अभियानांतर्गत विवीध कार्यक्रम गांवात राबवुन गावातील समस्या जाणून घेऊन आज आर्वी ता राजुरा जिल्हा चंद्रपूर या ठीकाणी सरपंच सेवा संघाच्या वतीने राजुरा तालुक्यातील काही गावांमध्ये कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे यावेळी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य गावातील युवक महीला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थिती होते