माझी आई या राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचा निकाल जाहीर

58

✒️अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620

बीड(दि.17जानेवारी):-मराठी साहित्य सखी मंच च्या मुख्य समूहप्रमुख/संचालक तथा मार्गदर्शक सौ. शालूताई विनोद कृपाले यांच्या वाढदिवसा निमित्त घेण्यात आलेल्या “माझी आई ” या विषयावरी राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
सर्वोत्कृष्ट मध्ये १) वीणा सारंग व्होरा पंढरपूर जि.सोलापूर तर प्रथम मध्ये दोन विजेते पुढील प्रमाणे १) लतिका ढोके, भुसावळ २) सरिता कलढोणे,
राहणार जुन्नर, असून द्वितीय मध्ये १)सौ.वीणा बाविस्कर,
जळगाव २)कु.वैष्णवी दिलीप काळे परसापूर जि.अमरावती हे विजेते आहेत, तर तृतीय क्रमांकावर १) जया वि.घुगे-मुंडे. बीड २)शिवांगी आर वेरुळकर
गुरुकृपा काॅलनी ,गोपाल नगर, अमरावती हे विजेते परीक्षकां कडून परीक्षन करून घोषित करण्यात आले आहेत.

विषेश प्राविण्य मध्ये देखील तीन स्पर्धाकांनी त्यांचा क्रमांक मिळवला असून ते पुढील प्रमाणे

१) आदेश काळेकर पिंपरी -चिंचवड २)सौ.भाग्यश्री खुटाळे फलटण ३) परमानंद ए.जेंगठे चंद्रपूर.हे विजेते आहेत.
यानंतर लक्षवेधी क्रमांकात १)सतिश कोंडू खरात,वाशिम २)भावना गांधिले, अहमदनगर ३)विद्या प्रधान ठाणे व उत्तेजनार्थ मध्ये १)आर्या संदेश मात्रे वसई जि.पालघर २)कु.दिपिका दिनेश क्षिरसागर धारणी (मेळघाट) जि.अमरावती ३) कु. सानिका संजय येवले मुंबई ४) कु. आकांक्षा रतन कुंठारे अमरावती
५) सौ. योगिता भगवंत शिरोरे, विठेवाडी ता.देवळा जि.नाशिक याप्रमाणे माझी आई या काव्य लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.स्पर्धेसाठी परीक्षक मनून दिलीप काळे सर यांचे योगदान लाभले असून अंगद दराडे यांच्या कडून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते तर नंदकुमार शेंद्रे यांच्या कडून ग्राफिक्स बनवण्यात आले आहे.

या स्पर्धेसाठी लाभलेल्या परीक्षक श्री. दिलीप तुळशिराम काळे परसापूर जि.अमरावती यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले आहे की, आपल्या – मराठी साहित्य (सखी) मंच आणि साहित्य तारांगण समूह यांचे संयुक्त विद्यमाने ” माझी आई ” या विषयावर स्पर्धा घेण्यात आली होती, त्या स्पर्धेच्या परिक्षणाची जबाबदारी समूह प्रशासक श्री.अंगदजी दराडे सर,प्रा.रावसाहेब राशिनकर सर,शालुताई कृपाले मॅडम,एम.एन.शेंदरे सर या सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला परिक्षणाची जबाबदारी दिली प्रथम मी या सर्वांचे आभार मानतो.

खरच मी माझे भाग्य समजतो मीही तुमच्यातलाच एक छोटासा साहित्यिक आहे.मी आजवर स्पर्धेचे परीक्षण केले परंतू या स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळाला. खरच आयोजकांच कौतुक करावस वाटत त्याच बरोबर तुम्हा सर्वांचे पण तुमची साहित्या विषयीची तळमळ पाहता मन भरुन आले.तुमच्या कार्याला माझा सलाम.या स्पर्धेत एकुण २४० कविता स्पर्धेसाठी आल्या होत्या.विषय हा ” माझी आई ” होता.मी सर्व कवितांच परिक्षण केले आणि तुम्हा सर्व साहित्यिकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला.मला सर्वांच्या कविता वाचायला मिळाल्या परंतु एक सांगाव लागतं विषेश म्हणजे उत्तम दर्जाचे जे लिखाण होते ते फक्त ” आई ” या विषयावर च झाले परंतु स्पर्धेची जी पोस्ट दिलेली होती.

त्यावर स्पष्ट उल्लेख होता ” माझी आई ” हि काव्य ओळ कवितेत यायला हवी तरी काहिंनी ” आई ” या विषयावर च लिखाण केले मला ” आई ” या विषयावर ज्या साहित्यिक लोकांनी लिखाण केले त्यांना न्याय देता आला नाही
परंतु मलाही नियमांच बंधन होत म्हणून मी ” माझी आई ” हि काव्य ओळ ज्या कवितेत आहे त्याच कविता निवडल्या तर तुम्ही गैरसमज करु नये.मला ” आई ” या विषयावर भरभरुन वाचायला मिळाल तुम्हा सर्वांना व तुमच्या लेखणीला माझा सलाम.परिक्षण करतांना अनेक बाबींचा विचार करता प्रथम कवितेचा प्रकार, कवितेचा आशय,प्रतिके,यमक,व्याकरण, शब्दसामर्थ्य हे सर्व पाहून मी परिक्षण केले व न्याय देण्याचा प्रयत्न केला.

तुम्हा सर्वांना परिक्षक या नात्याने एक सांगावस वाटत की प्रथम स्पर्धेची पोस्ट व्यवस्थीत वाचावी नंतर कविता लिहावी व ती कविता कमीत कमी तिन वेळा वाचावी नंतर स्पर्धेसाठी पाठवावी आणखी एक सांगाव वाटत मीही तुमच्यातलाच एक कवी आहे.” आई ” या विषयावर लिहणाऱ्या कविवर्यांना मी न्याय देवू शकलो नाही मला याच वाईट वाटतं कारण ” माझी आई “काव्य ओळ बंधनकारक होती,तरी निराश होऊ नका.काही चुक झाली असल्यास मोठ मन करुन मला माफ कराल हिच आशा.
!! आपल्याला आणि विजेत्यां सर्व स्पर्धकांना माझ्या
मनापासुन खुप खुप शुभेच्छा !!