राष्ट्रीय श्रमशक्ती आदर्श समाजभुषण पुरस्काराने सन्मानित

26

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कोल्हापूर(दि.18जानेवारी):- एकता सामाजिक सेवा संस्था, इचलकलरंजी यांचे मार्फत देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय श्रमशक्ती फिनिक्स ॲवार्ड 2021 यांचे वितरण सोहळा श्रीमंत बाबासाहेब घोरपडे नाट्यगृह इचलकलरंजी येथे पार पडला. यावेळी सत्यर्थ एंटरप्रायझेस कोल्हापूर या संस्थेच्या फाऊंडर स्मिता जयंत लंगडे यांना राष्ट्रीय श्रमशक्ती आदर्श समाजभुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोरोना लाॅकडाउन काळात केलेल्या विशेष कामासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

पुरस्काराचे वितरण झी मराठी वरील कथाकार भगरे गुरूजी, फाॅरेनची पाटलीन फेम सुरेखा कुडचि, लावणी सम्राज्ञी मेघा घाटगे व तुझ्यात जिव रंगला फेम छाया सांगावकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्थापक अध्यक्ष अमित काकडे यांनी केले. या पुरस्काराबद्दल स्मिता लंगडे यांना संपूर्ण राज्यभरात वर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.