अखेर डॉ.पंजाबराव देशमुख यांची जयंती शासन स्तरावर होणार साजरी

33

🔹पॉवर ऑफ मिडीया संघटनेने लावून धरली होती मागणी

🔸पत्रकार उत्तम ब्राम्हणवाडे यांच्या प्रयत्नांना यश

✒️प्रदिप रघुते(अमरावती प्रतिनिधी)मो:-9049587193

अमरावती(दि.18जानेवारी):-भारताच्या इतिहासात अनेक कृषी महर्षी, शिक्षण महर्षीयाचे योगदान अफाट आहे. मात्र अनेक कृषी महर्षी, शिक्षण महर्षीयाच्या स्मृती सरकार दरबारी आजही उपेक्षित दिसून येतात. मागासलेल्या विदर्भात शिक्षणाची गंगा आणनारे, स्वतंत्र भारताचे पहिले कृषीमंत्री, शिक्षण महर्षी, डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख हे असेच एक नाव आहे. विदर्भातील मुल / मुली शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था स्थापण केली. यासाठी ते विशेष लक्षात राहतील. केवळ शिक्षणासाठीच नव्हे तर विदर्भातील शेतकर्यांचा मसिहा अशी त्यांची ओळख असून. या शिक्षण महर्षींना स्वातंत्र्याच्या ७३ व्या वर्षांनंतर सरकार दरबारी न्याय मिळाला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख यांची जयंती पहिल्यांदाच शासन स्तरावर साजरी केली जाणार आहे.

भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंतीला अर्थातच २७ डिसेंबर या दिवशी शासकीय स्तरावर जयंती साजरी करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने जारी केले आहे. गेल्या अनेक वर्षापासून डॉ. भाऊसाहेब देशमुख यांची जयंती शासकीय स्तरावर व्हावी यासाठी पॉवर ऑफ मिडीयाचे विभागीय अध्यक्ष पत्रकार उत्तम ब्राम्हणवाडे प्रयत्नशील होते. पॉवर ऑफ मीडियाने शासनासोबत सतत पत्रव्यवहार केल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने आपल्या परिपत्रकामध्ये याबाबतची अधिकृत नोंद केली आहे. तसेच याबाबतचे पत्र पत्रकार उत्तम ब्राम्हणवाडे यांना नुकतेच प्राप्त झाले आहे. सन २०१६ पासून सतत शासनासोबत त्यांनी पत्रव्यवहार करून ही मागणी लावून धरली होती.

अखेर या मागणीला यश येऊन शासनाने थोर पुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी साजरी करण्यात येणाऱ्या परिपत्रकामध्ये याबाबतची अधिकृत नोंद करून २७ डिसेंबर ही डॉ. भाऊसाहेब देशमुख यांची जयंती शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये साजरी करण्याचे आदेश जारी केले आहेत. याबाबत महाराष्ट्र शासनाने अध्यादेश जारी केल्यानंतर अमरावती जिल्ह्यासह संपुर्ण विदर्भात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात पॉवर ऑफ मिडीया या पत्रकार संघटनेने शासणाचे विशेष आभार मानले आहे.