नागभीड तालुक्यात ४१ पैकी २१ ग्रामपंचायत वर भाजपचा विजय

🔹भाजपा जिल्हा महामंत्री व जि.प.सदस्य संजय गजपुरे यांच्या जि.प.क्षेत्रात १० पैकी ८ ग्रामपंचायती भाजपाकडे

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

नागभीड(दि.18जानेवारी):-तालुक्यात तळोधी (बा.) , वाढोणा , पेंढरी , कोथुळणा , विलम, म्हसली, चिंधीचक, जनकापुर, किटाडी(बो.), पळसगाव(खुर्द), बोंड, बाळापुर( बुज.), देवपायली, पारडी ठवरे, कोर्धा, नवेगाव हुंडेश्वरी, चिकमारा, नांदेड, बाळापुर(खुर्द), वैजापुर , कोजबी माल, आकापुर या २२ ग्रामपंचायत वर भाजपाला बहुमत प्राप्त . तालुक्यात १८४ सदस्य भाजपाचे विजयी.

भाजपा जिल्हा महामंत्री व जि.प.सदस्य संजय गजपुरे यांच्या पारडी- बाळापुर क्षेत्रात १० पैकी ८ ग्रामपंचायत वर भाजपाचे वर्चस्व…बोंड ग्रामपंचायत मध्ये सौ.कुसुम कोहपरे व अशोक कोहपरे तसेच सौ.निशा सिडाम व जैतराम सिडाम या पतीपत्नी जोडप्यांनी विजय प्राप्त केला.

कोजबी माल ग्रामपंचायत मध्ये शेवंताबाई सोमाजी भोयर या ७१ वर्षीय महिला व कु.सोनम नरेश शेंडे या २१ वर्षीय मुलीने भाजपाच्या पँनल कडुन विजयाची मोहर उमटवली…

महाराष्ट्र, राजकारण, राजनीति

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED