बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीती नांदेड कडुन केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांना निवेदन सादर

25

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.18जानेवारी):-आज दि १८ जानेवारी २०२१ रोजी केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण राज्यमंत्री रामदास आठवले हे नांदेड दौ-यावर आले असता कमल फाऊंडेशन संचलित बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीती नांदेड कडुन केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांना बेरोजगार दिव्यांगांच्या प्रलंबित विविध न्याय मागण्या संदर्भात आज दि 18 जानेवारी 2021 रोजी जिल्हा नियोजन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे निवेदन देण्यात आले.

या निवेदनात बेरोजगार दिव्यांगांच्या प्रमुख मागण्या पुढिल प्रमाणे १) नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी दिव्यांग आयोग तथा दिव्यांग मंडळ स्थापन करण्यात यावे.

२) दिव्यांग सुधारीत कायदा २०१६ ची नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात अंमलबजावणी करण्यात यावी.

३) भारतीय राज्य घटनेनुसार एखाद्या घटकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी दिव्यांगांनाहि राजकीय आरक्षण देण्यात यावे.

४) सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरी स्वराज्य संस्था यांचयाकडिल दिव्यांगांचा अखर्चित निधी तत्काळ खर्च करण्यात यावे.

५) बेरोजगार दिव्यांगांना रोजगारासाठी जागा देण्यात यावी आणि शासकिय निमशासकीय अणुशेष तत्काळ भरून काढण्यात यावा.

६) बेरोजगार दिव्यांगांना अंत्योदय राशन कार्ड आणि बिनाअट घरकुल देण्यात यावे.यासह इतर विस मागण्यांचे निवेदन आज दि १८ जानेवारी २०२१ रोजी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवले यांना देण्यात आले.

यावेळी निवेदन देताना राहुल साळवेसह अमरदिप गोधने.कार्तिक भरतीपुरम.राजु ईराबतीन.सय्यद आरिफ.भोजराज शिंदे.नागेश निरडी.परमेश्वर आखाडे.शेख आलीम.मनोहर पंडित.प्रशांत हणमंते.गणेश मंदा.सय्यद हाकिम.सिद्धोधन गजभारे हे उपस्थित होते.