तरुण भारतचे पत्रकार एल.के.सरतापे याचा चैतन्य पुरस्काराने गौरव

23

✒️सचिन सरतापे(प्रतींनिधि,म्हसवड-माण)मो:-9975686100

म्हसवड(दि.18जानेवारी):-दहिवडी येथील “चैतन्य करिअर अकॅडमी” व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र दहिवडी या संस्थेच्या१३ व्या वर्धापनदिना निमित्ताने भव्य रक्तदान शिबीर, चैतन्य पुरस्कार ,कोरोना योद्धा ,यशस्वी विद्यार्थी पञकार बंधुचे सत्कार मा. आ डॉ दिलीप येळगांवकर, तहसीलदार बाई माने, दहिवडी पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशनचे राजकुमार भुजबळ, भास्करराव गुंडगे, जिप सदस्य डाँ भारती पोळ संजय भोसले जिल्हा उपाध्यक्ष शिवसेना सौ साधना सिदार्थ गुंडगे आदी राजकीय ,शैक्षणिक ,सामाजिक,पत्रकार मित्र पोलीस पाटील विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.

यावेळी तरुण भारतचे प्रतिनिधी एल के सरतापे यांनी लॅकडाऊन व करोना महामारीत लोकसहभागाच्या मदतीतुन चार महिने अन्नदान केल्याने हजारोची उपासमारी रोखून सामाजिक काम केल्याबद्दल त्यांना “चैतन्य करोना योध्द्या” हा पहिल्या चैतन्य पुरस्काराने गौरवण्यात आले करोणा काळात केलेले काम हे स्तुतीजन्य असले तरी म्हसवड व परिसरातील लोकांचे जिव वाचावे या साठी आम्ही म्हसवडकर ग्रुपच्या माध्यमातुन लोकसहभागाच्या लोकवर्गणीतुन 15बेडचे सुसज्ज आॅक्शीजन सह सर्व सोयीनीयुक्त मोफत कोव्हीड पाॅझीटिव्ही रुग्णांना उपचार व्हावे यासाठी उभे करुन शेकडो लोकांचे जिव वाचवण्याचे काम आम्ही म्हसवडकर ग्रुपच्या माध्यमातुन करण्याचे काम अविस्मरणीय आसल्याचे आ दिलीपराव येळगावकर यांनी व्यक्त केले.

मान्यवर मंडळीच्या उपस्थीतीत प्रथम दिपप्रज्योलन करुन मान्यवरांचे स्वागत अॅकॅडमीचे प्रमुख श्री संदिप खाडे यांनी केले तर या कार्यक्रमाची प्रस्तावना आयोजन संदिप खांडे यांनी या कार्यक्रमाची रुपरेषा सांगताना म्हणाले यावर्षापासुन संस्थेच्या नावाचा मानाचा चैतन्य पुरस्कार वितरण करणार असुन पुढील वर्षी स्वताच्या इमारतीत हां कार्यक्रम घेणार असल्याचे खाडे यांनी सांगून विविध पुरस्कारांचे वितरण उपक्रम शिल शिक्षीका भारती ओंबासे, कोल्हापुर येथील न्यायाधीश स्मृती गंबरे, एपीआय राजकुमार भुजबळ यांचा सत्कार करण्यात आला.

तर करोना काळात व लॅकडाऊन मध्ये स्वताची काळजी न करता चार महिने भुकेल्याची भुक मग ते दवाखाण्यातील रूग्ण, वेडसर मतीमंद, वृध्द माता पीता यांना दोन वेळचे अन्नदान लोकसहभागातुन व लोकवर्गणीच्या माध्यमातुन मोफत देण्याचे काम करणारे व करोना पाॅझीटिव्ही रुग्णांना वेळेत व मोफत उपचार मिळावे यासाठी लोकसहभागातुन लोकवर्गणीतुन १५ बेडचे हाॅस्पिटल उभा करुन शेकडोचे जिव वाचवणारे खरे करोना योध्दे एल् के सरतापे त्याचा सत्कार करण्यात आला यावेळी , विशाल गुंजवटे , आय्याज मुल्ला , शेखर जाधव, उमेश बुधावले, लुनेश विरकर, महेश कांबळे, महेश जाधव, नवनाथ जगदाळे, रुपेश कदम आदी पत्रकांराच्या सत्कारा बरोबर पोलिस पाटिल, विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला.