गंगाखेड तालुक्यात महाविकास आघाडीची आघाडी – गोविंद यादव

65

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.18जानेवारी):- आज झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत गंगाखेड तालुक्यात महाविकास आघाडीने घवघवीत संशय संपादन केले आहे. बहुतांष मोठ्या गावांमध्ये महाविकास आघाडीचे पॅनल विजयी झाले असून या विजयामुळे ग्रामिण भागातील नागरिकांचा सरकारबाबतीतला कल स्पष्ट झाला असल्याची प्रतिक्रिया कॉंग्रेसचे गंगाखेड तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी व्यक्त केली आहे.

गंगाखेड तालुक्यातील ईसाद, पडेगाव, धारासूर, मुळी, मरडसगाव, कौडगाव, हरंगूळ, सायळा, सुपा आदि प्रमुख ग्रामपंचायतींसह ईतर अनेक गावांमध्ये महाविकास आघाडीच्या स्थानिक आघाड्यांनी विजय संपादन केला आहे. या विजयामुळे महाविकास आघाडी कार्यकर्त्यांमध्ये ऊत्साह असून आगामी काळातही आघाडीची घौडदौड अशीच सुरू राहील, असा विश्वास गोविंद यादव यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, आज विजय संपादन केलेल्या विविध गावांमधील उमेदवारांचा कॉंग्रेसचे जेष्ठ नेते, माजी सभापती बाळकाका चौधरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव, शहराध्यक्ष शेख युनूस, सुशांत चौधरी, हाजी शेख गफारभाई, संजय धारे आदिंची ऊपस्थिती होती.