इंडियाज पोस्ट पेयमेंट बँक खाते काढून विविध सुविधांचा लाभ घ्यावा- डाक विभागाचे आवाहन

89

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)मो:-9561905573

बुलडाणा(दि.18जानेवारी):- भारतीय डाक विभागातर्फे इंडियाज पोस्ट पेमेन्ट बँक आयपीपीबी सुरु करण्यात आली आहे. नागरिकांनी आपले खाते काढून बॅकेच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. या खात्यांमध्ये रोजगार हमी योजना, श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना, किसान सन्मान योजना, खावटी योजना, विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना, शासनाच्या सर्व प्रकारच्या सबसिडी योजनांचे लाभ व छोटया मोठया व्यापाऱ्यांकरीता चालू खाते काढण्याची सुविधा देण्यात आली आहे.सदर खाते हे ‘झिरो बॅलन्स’वर चालू ठेवता येते. याशिवाय एईपीएस माध्यमातून आपण इतर कोणत्याही बॅक खात्यातील पैसे आपल्या नजिकच्या डाक कार्यालयातून काढू शकतात. आवश्यकता असल्यास आपण पोस्टमनद्वारे घरी सुध्दा एईपीएस माध्यमातून पैसे काढू शकतात.

राज्य व केंद्र सरकारच्या पेंशनरकरीता घरबसल्‍या जिवन प्रमाण योजनेचे प्रमाणपत्र काढू शकतात. या योजनेचे नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन डाक विभागाचे अधिक्षक ए. के. इंगळे यांनी केले आहे.
तसेच आयपीपीबी मोबाईल ऑप डाक पे ॲप, वर्च्युअल एटीएम, ऑनलाईन बिल भरण्याची सुविधा विनामुल्य आहे. सदर ॲपमधून आपण कोणत्‍याही पोस्ट ऑफीसचे आरडी, पीपीएफ, सुकन्या खात्यात विनामुल्य घरुनच भरणा करु शकता.

त्या मधून विज बिल, विमा हप्ता, मोबाईल रिचार्च, गॅस सिलेंडर बिलाचा भरणा करु शकता. आपल्याला खाते काढण्याकरीता फक्त आधार क्रमांकाची आवश्यकता आहे. इतर कोणत्याही प्रकारचा फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही. सदर खाते आपण आपल्‍या पोस्टमनद्वारे आपल्या घरी काढण्याची सुविधा उपलब्ध्‍ आहे. आयपीपीबी बॅंकेद्वारे आपणास सर्व सामान्य विमा पॉलीसी नॉन लाईफ विमा काढता येते.तरी नागरिकांनी खाते काढून विविध सुविधांचा लाभ घ्यावा,असे आवाहन डाक विभागाच्यावतीने करण्यात आले आहे