किरमिरी हीवरा मार्गावर भीषण अपघात, अपघातात दोघांचा मृत्यू

26

🔺रस्ता कामात विलंबाने अपघातात वाढ.

✒️नितीन रामटेके(गोंडपीपरी,तालुका प्रतिनिधी):-8698648634

गोंडपिपरी:- गोंडपिपरी तालुक्यातील किरमीरी येथे घरगुती कार्यक्रमाला गेलेल्या दोघांचा अपघातात मृत्यू झाल्याची दूदैवी घटना सोमवारचा रात्रौ घडली. ही घटना किरमीरी-हिवरा मार्गावर घडली.

परिसरात सध्या रस्त्याचे काम सुरू असल्याने रस्त्यावर खोदकाम केले गेले आहे. त्यामुळे हे मार्ग अपघाताला आमंत्रण देत आहेत. अश्यातच काल रात्री घरगुती कार्यक्रम आटोपून परत येत असताना दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. नितेश झाडे,गोकुळ झाडे असे मृतकांची नावे आहेत.