लावलेले खोटे गुन्हे परत घ्या, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे निवेदन

30

🔺नागपुरला 4 जानेवारीला विज व विदर्भ मोर्चांचे वेळी लावलेले खोटे गुन्हे

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.19जानेवारी):- विदर्भ राज्य आंदोलन समिती आंदोलनाचे नेते ॲड. वामनराव चटप, राम नेवले, रंजना मामर्डे, मुकेश मासुरकर सहीत 4 कार्यकरत्यांवर जरीपटका पोलीस स्टेशन, नागपुरला 4 जानेवारीला विज व विदर्भ मोर्चांचे वेळी लावलेले खोटे गुन्हे परत घेण्यात यावे असे निवेदन सादर करण्यात आले. खालील प्रमाणे लावलेले गुन्हे,353, 294, 506, 186, 143, 145, 149, 188, 269, 270, मादवि व सहकलम 135, मपोका सहकलम 51(3) राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा सन 2005 जरीपटका पोलीस स्टेशन, नागपूर.

कोरोना काळातील विज बिल सरकारने भरावे. 200 युनिटपर्यंत विज विल फ्री करावे त्यानंतरचे विज दर निम्मे करावे, कृषी पंपाचे विज बिल घेऊ नये आदी मागण्यासाठी दि. 4 जानेवारी 2021 ला “विज व विदर्भ मार्च” विदर्भ राज्य आंदोलन समिती तर्फे संविधान चौक, नागपूर ते ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या निवासस्थानापर्यंत 5 कि.मी. पायी हा मोर्चा काढण्यात आला होता. अँड. वामनराव चटप, राम नेवले, रंजना मामर्डे , यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. शांततेने घोषणा देत हा मोर्चा कडवी चौकात गेल्यावर पोलीसांनी अडविला. मा. नितीन राऊतजी यांना 10 दिवस अगोदरच आम्ही तुम्हाला निवेदन देण्यास व चर्चा करण्यास येणार म्हणून पत्राद्वारे कळविले होते. परंतु नितीन राऊत घरी थांबले नाही. शिष्टमंडळास भेटले नाही.

उलट आपल्या पोलीसानी मात्र मोर्चा अडवून नितीन राऊतजी यांना भेटण्यास शिष्टमंडळालाही जाऊ दिले नाही, राऊत साहेबांना पण बोलाविले नाही किंवा चर्चाही घडवून न आणता दंडकेशाही चालवून प्रचंड फोर्सने ताकत लाऊन मोर्चाला मागे ढकलवून मोर्चा पांगविण्याचे काम केले. कार्यकर्त्यांच्या गच्च्या पकडून गाडोत कॉबले, 300 कार्यकर्त्यांना मुख्यालय पोलीस लाईन टाकळी येथे अटक करून नेऊन नंतर सोडून देण्यात आले. नंतर मात्र एका पोलीस शिपायाच्या तक्रारीवरून ॲड. वामनराव चटप, राम नेवले,

रंजना मामर्डे , मुकेश मासुरकर सह 34 विदर्भवाद्यांवर 353, 294, 506 सारखे गंभीर गुन्हे नोंदविले हे यांनी केलेच नाही मग असे खोटे गुन्हे कसे दाखल केले? आपणास विनंती आहे की जे गुन्हे यांनी केलेच नाही ते खोटे गुन्हे त्वरीत परत घ्या व ज्यांनी हे खोटे गुन्हे दाखल केले त्यांचेवर कार्यवाही करा. बिना परवानगी मोर्चा वर्गरे गुन्हें त्याबाबत आमची तक्रार नाही. परंतु धक्काबुक्की ही मोर्चामध्ये होतच असते. परंतु 353, 294, 506 हे गंभीर गुन्हे कोणीच केले नाही हे साफ खोटे आहेत.

तरी हे गुन्हे गृह विभागाने परत घ्यावे अन्यथा विदर्भ राज्य आंदोलन समिती तर्फे संपूर्ण विदर्भभर विदर्भवादी आंदोलन छेडतील असा इशारा निवेदनाद्वारे विदर्भवादी यांनी दिला.