अपंग जनता दल सामाजिक संघटना चे अमरावती जिल्हा अध्यक्ष मयूर मेश्राम याची हिवरा (बु)ग्रामपंचायत निवडणुकीत दणदणीत विजय

✒️प्रदिप रघुते(अमरावती प्रतिनिधी)मो:-9049587193

अमरावती(दि.19जानेवारी):- अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य ही एक सामाजिक संघटना असून या संघटने च्या माद्यमातून अपंगांच्या न्याय व हक्क साठी सतत कार्य महाराष्ट्र राज्या मध्ये जोमाने सुरु असून या ग्रामपंचायत निवडणुकीत अपंग जनता दल सामाजिक संघटने च्या वतीने अमरावती जिल्ह्या मधून अनेक अपंग उमेदवार उभे केले होते,यामध्ये अपंग जनता दल सामाजिक संघटना चे जिल्हा अध्यक्ष मयूर मेश्राम हे नांदगाव खंडेश्वर मधील हिवरा बुजरूक येतील वार्ड नंबर 2 मध्ये उमेदवार होते.

त्याच्या विरोधात दमदार उमेदवार निवडणुकीत उभे असून सुद्धा एक अपंग उमेदवाराला गावातील लोकांनी विजयी केले असून या विजया निमित्त अपंग जनता दल सामाजिक संघटना अमरावती जिल्हा कार्यलय मध्ये त्याचा अपंग नेते श्री शेख अनिस पत्रकार याचा हस्ते सत्कार करण्यात आला असून यावेळी जेष्ठ अपंग सेवक श्री सुधाकर काळे, श्री नरेंद्र दाभाडे (वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते जिल्हा परिषद समाज कल्याण अपंग विभाग). श्री प्रदीप रघुते.( तालुका अध्यक्ष नांदगाव खंडेश्वर ) राजिक शहा. किशोर मानेकर. गोसावी सर. तेजस नन्नावरे. मनोज हांडे. ज्ञानेश्वर हांडे अक्षय गुल्हाने, संतोष चव्हाण. एकनाथ रंगारी. उमेश मेश्राम. माधवी रामटेके. हर्षा खराबे. उज्वला टाले.लताताई हांडे हे प्रमुख उपस्थित होते.

अमरावती, महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED