बांधकाम कामगाराना गुहउपयोगी वस्तु मिळणार

31

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.20जानेवारी):-इमारत व इतर बांधकाम या व्यवसायात काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना संबंधित आस्थापनेचे काम पूर्णत्वास आल्यावर रोजगारासाठी नविन बांधकाम जेथे सुरु होते तेथे स्थलांतरीत व्हावे लागते . अशा स्थलांतराच्या ठिकाणी त्यांना नव्याने निवास , पाल्यांचे शिक्षण , आरोग्यविषयक समस्या व भोजन याबाबत जुळवुन घ्यावे लागते.

त्यांना दैनंदिन भोजन तयार करण्यास सहाय्य व्हावे म्हणून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ , मुंबई यांनी दिनांक २७.१०.२०२० रोजीच्या बैठकीत राज्यातील मंडळाच्या १० लक्ष नोंदीत सक्रिय ( जिवीत ) बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तू संच वितरण करण्याबाबतचा ठराव पारित करण्यात आला . सदर ठरावाच्या अनुषंगाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदीत लाभार्थी बांधकाम ( ज्याची नोंदणी सक्रिय आहे ) कामगारांच्या गृहपयोगी वस्तू संच वितरण योजनेस मंजुरी देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदीत इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी ( ज्याची नोंदणी सक्रिय आहे ) यांचेसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने गृहपयोगी वस्तू संच वितरण करण्याच्या योजनेस शासन मंजुरी प्रदान करण्यात येत आहे . योजनेच्या अटी व शर्ती : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदणीकृत असलेला बांधकाम कामगार ( ज्याची नोंदणी सक्रिय आहे ) या योजनेचा लाभार्थी राहील.