म्हसवड नगरपालिका क्षेत्रातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी म्हसवड काँग्रेस चे नगरसेवक विकास गोंजारी करणार नगरपालिके पुढे उपोषण

27
✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड-माण)मो:-9975686100

म्हसवड(दि.20जानेवारी):-सामावन्य लोकांचे हिताचे प्रश्न सोडवण्यासाठी नगरसेवक विकास गोंजारी 25 जानेवारी 2021 रोजी नगरपालिके पुढे उपोषण करणार आहेत असे निवेदन म्हसवड नगरपालिकेला देण्यात आले आहे.यावेळी निलेश काटे सातारा जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीसनगरसेवक विकास गोंजारी ,माजी काँग्रेस तालुका अध्यक्ष विश्वंभर बाबर , माजी उपसभापती विजय बनसोडे, बाबासाहेब माने, अनिल लोखंडे, सुरेश उबाळे उपस्थित होते.

म्हसवड चे नगरसेवक विकास गोंजारी यांनी अनेक वेळा मागणी करून ही त्यांचे कामास टाळाटाळ केल्यामुळे ते उपोषणा स बसणार आहेत.व त्यावेळेस होणाऱ्या प्रकाराची जबाबदारी पूर्ण पणे नगरपालिके वर राहील असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.रामोशी नाका जवळील खाणी तील दूषित पाणी बाहेर काढावे तसेच म्हसवड बस स्थानकामध्ये येणाऱ्या दुषित पाण्याची विल्हेवाट लावणे तसेच नगरपालिका शेजारी नवीन भाजीमंडई इमारत वापरा साठी खुली करणे तसेच शिक्षक कॉलनी ते बाजार समिती कार्यालया समोरील गटार बांधकाम तातडीने करण्यासाठी उपोषण करणार आहे असे नमूद केले आहे,