वाळू विरुद्ध गेवराई ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण

30

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.20जानेवारी):- तालुक्यातील गोदापात्र व सिंदफना नदी पट्‌ट्यात रात्री-अपरात्री हायवा व ट्रॅक्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक होत आहे.संबंधित वाळू तस्कर महसूल व पोलिस प्रशासनातील कर्मचार्‍यांना हाताशी धरून गोदापात्रात वाळूचे उत्खलन करत आहेत.याबाबत वेळोवेळी प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना अनेकवेळा सूचना निवेदन देऊनही कुठलीच कारवाई होत नसल्याने विविध मागण्या घेऊन आ. लक्ष्मण पवार यांनी गोदापट्‌ट्यातील ग्रामस्थ व कार्यकर्त्यांसह तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

गेवराई तालुक्यात गोदापत्रातून होणार्‍या अवैध वाळू वाहतुकीबाबत आ.लक्षण पवार यांनी दि.१३ जानेवारी रोजी प्रशासनाला निवेदन देऊन आमरण उपोषणाचा इशारा दिला होता.याबाबत प्रशासनाने कुठलीही दखल ना घेतल्याने त्यांनी आज सकाळपासून उपोषणाला सुरुवात केली आहे. प्रशासनाला दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले होते की दि.४ जानेवारी रोजी राक्षसभुवन रोडवरील गंगावाडी येथील रुस्तुम मते यांना वाळू वाहतूक करणार्‍या भरधाव वेगात हायवाने चिरडल्याने यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहेया दुर्दैवी घटनेने गोदा पट्‌ट्यातील ग्रामस्थांमध्ये संताप निर्माण झाला आहे.

ज्यामुळे कायदा  सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. प्रशासनाने या प्रकरणात गाडी जप्त करून संबंधित वाहन चालकावर गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे सदरील वाहनाचा मालक पोलीस कर्मचारी असल्याचे निदर्शनास आले आहे. या आधीही वाळूने भरलेल्या वाहनांमुळे अनेकांचे जीव गेले आहेत तरी प्रशासन कोणतीही कठोर पावले उचलल्याचे निदर्शनात आले नाही.