तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी – अप्पर जिल्हाधिकारी

36

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)मो:-9561905573

बुलडाणा(दि.21जानेवारी):- तंबाखू नियंत्रण कार्यक्रमातंर्गत तंबाखू मुक्त शाळा, तंबाखूमुक्त आरोग्य संस्था आदी उपक्रम राबविण्यात येतात. तंबाखूमुळे गंभीर आजार होतात. तंबाखू सेवन, विक्री आदीविंषयी तंबाखू नियंत्रण कायदा आहे. या कायद्याची अंमलबजावणी केल्यास तंबाखु सेवनाला प्रतिबंध घालता येईल. तंबाखू विक्री व सेवनाबाबत कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई वाढविण्यात यावी, अशा सूचना प्र. अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी आज दिल्या.तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात करण्यात आले होते.

त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कांबळे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी सुनील शेळके, कार्यक्रमाच्या समन्वयक डॉ. लता बाहेकर आदींसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी डॉ लता बाहेकर यांनी तंबाखू नियंत्रण कार्यक्रमातंर्गत केलेल्या कार्यवाहीची माहिती सादर केली. तंबाखूमुक्त शाळा करण्यासाठी जिल्ह्यातील 75 शाळांमध्ये पिवळी रेषा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. तसेच तंबाखू बाबत संयुक्त पथकाच्या कारवाई वाढविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली