देवपूर बसस्थानक येथे स्वच्छता अभियान व श्रमदान कार्यक्रम सपंन्न

29

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

धुळे(दि.22जानेवारी):- नेहरू युवा केंद्र धुळे व वीरांगना झलकारी बाई कोळी महिला/युवा मंडळ(संस्था) यांच्या सयुंक्त विद्यमाने धुळे येथील देवपूर बसस्थानक येथे स्वच्छता अभियान व श्रमदान कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले… यावेळी बसस्थानक येथील दररोज प्रवास करणा-या विद्यार्थ्यांमध्ये वीरांगना झलकारी कोळी संस्थेच्या सौ गीतांजली कोळी यांनी स्वच्छतेविषयी जनजागृति केली….तसेच सार्वजनिक स्थळे घाण होऊ नये म्हणून युवकांनी जागृत राहून स्वच्छतेविषयी जनजागृति केली पाहीजे असे मत व्यक्त केले..

परीणामी अनेक युवकांनी यास समर्थन दर्शवीत देवपूर बसस्थानक येथे हातात झाड़ू खराटे घेऊन सौ गीतांजली कोळी यांच्या सोबत स्वच्छता मोहीम राबवून श्रमदान केले…. यानंतर अल्पोहार ही सदर विद्यार्थ्यांना देण्यात आला यावेळी देवपूर बसस्थानकवरील प्रवास्यांनी आनंद व्यक्त केला… यावेळी बसस्थानकवरील सुरक्षा रक्षक श्री माळी दादा, रवींद्र कोळी, मयूर कोळी तसेच दररोज बसने प्रवास करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते…