गाठोड्यात कापूस घेऊन शेतकऱ्याची तहसील कार्यालयात धाव

🔺कापूस घेण्यास ग्रेडर चा नकार-केशव जिनिंग येथील प्रकार

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.22जानेवारी):- पालम रोड वरील केशव जिनिंग मध्ये शेतकऱ्यांनी टेम्पो भरून आलेला कापूस खरेदीस ग्रेडर ने नकार दिला. नाकारलेला कापूस गाठोड्यात भरून शेतकऱ्याने सखाराम बोबडे पडेगावकऱ्यांच्या मदतीने तहसील कार्यालय गाठत आपली कैफियत मांडली .हा प्रकार शुक्रवारी घडला.

विठ्ठलवाडी येथील शेतकरी शिवराज भगवान चिलगर हे आपला स्वतःच्या शेतात पिकवलेला कापूस घेऊन शुक्रवारी पालम रोडवरील केशव जिनिंगवर दाखल झाले. गाडीचे वजन होऊन गाडी खाली करण्यासाठी सुरू करताच अर्धी गाडी खाली झाल्यानंतर कदम यांनी हा कापूस खराब असल्याचे सांगत तो खरेदी करण्यास नकार दिला. शेतकरी चिलगर यांनी ही बाब धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक तथा परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकऱ्यांना मोबाईलद्वारे कळवली.

खरेदीस नकार दिलेला कापूस पिशवीमध्ये भरून सखाराम बोबडे पडेगावकऱ्यांच्या मदतीने त्यांनी तहसीलदार स्वरूप कंकाळ यांनी भेट घेत आपली कैफियत मांडली. तहसीलदार कंकाळ साहेब यांनी शेतकऱ्यांनी आणलेल्या कापसाची पाहणी करत तात्काळ संबंधितांना योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले .यावेळी शेतकरी नेते पंडितराव घरजाळे उपस्थित होते. शेतकऱ्यांचा कापूस नाकारणाऱ्या कदम यांच्यावर कायदेशीर कारवाई करत शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्याचे आदेश द्यावेत असे लेखी निवेदन यावेळी तहसीलदारांना देण्यात आले.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED