शैक्षणिक निर्देशांक नुसार महाराष्ट्र राज्य देशात पाचवे- शिक्षण विस्तार अधिकारी सुभाष पगार याची माहिती

  36

  ✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439

  नाशिक(दि.22जानेवारी):-केंद्र शासनाने परफॉर्मन्स ग्रेडिंग इं डेक्स नुसार सन २०१८- १९ मध्ये सर्व राज्याचे मूल्यांकन केले त्यानुसार महाराष्ट्र राज्याचा पाचवा क्रमांक असून महाराष्ट्र देशात अव्वल येण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील घटकांनी प्रयत्न करावे असे आवाहन दिंडोरी चे शिक्षण विस्तार अधिकारी सुभाष पगार यांनी केले.

  पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने गट शिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांचे मार्गदर्शन खाली दिंडोरी तालुका गुणवत्ता कक्ष बैठकीचे आदर्श इंग्लिश स्कूल दिंडोरी येथे आयोजन करण्यात आले.बैठकी प्रसंगी मार्गदर्शन करतांना सुभाष पगार बोलत होते.यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी,केंद्रप्रमुख, विषय तज्ञ,विशेष तज्ञ, विशेष शिक्षक,उपस्थित होते.

  बैठकीचे सुत्रसंचलन शिक्षण विस्तारअधिकारी वंदना चव्हाण यांनी केले.पुढे बोलतांना पगार यांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक बाबी विषयी माहिती दिली. शैक्षणिक निर्देशांक वाढीसाठी राष्ट्रीय संपादणूक चाचणी, फल निष्पत्ती,व्यवसाय शिक्षणाची सुविधा, दिव्यांग विद्यार्थ्यांचा सेवा सुविधा,यामध्ये राज्याचा स्तर उंचावण्यासाठी सर्व घटक महत्वाचे आहेत असे नमूद केले.तसेच जिल्हा गुणवत्ता समृध्दी अभियान हा महत्वाचा प्रकल्प असून आंतर राष्ट्रीय शाळा तालुक्यात निर्माण करावयाची असून अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर,विषय मित्र,गल्ली मित्र,या बाबींचा ऊहापोह पगार यांनी केला.

  स्कॉलरशिप बाबत शिक्षण विस्तार अधिकारी सुनीता अहिरे यांनी मार्गदर्शन केले. समावेशीत शिक्षण विभागाचे विशेष तज्ञ ज्ञानेश्वर क्षीरसागर यांनी शालेय अभिलेख रजिस्टर चे महत्व,सुयोग्य नियोजन व व्यवस्थापन चे फायदे,शालेय दफ्तर जतन कालावधी,आर्थिक नोंदी,सेवा पुस्तक नोंदी,या बाबींची माहिती देऊन मार्गदर्शन केले.विषयतज्ञ आरती डींगोरे यांनी शासनाच्या शैक्षणिक दिनदर्शिका बाबत विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा उपयोग होत असल्याचे नमूद केले.रूम टु रिड या उपक्रमाबाबत ओमकार हारम यांनी माहिती दिली.तसेच राजापूर शाळेचे विश्वास आहेर, अंबानेर शाळेचे गोविंद गीरी यांनी शाळेत राबविलेले नावीन्यपूर्ण उपक्रम बाबत सादरीकरण केले.

  बैठकीचे तांत्रिक संचलन कलावंत मावची यांनी केले.
  या बैठकीसाठी शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत गवळी,मंगला कोष्टी,सुनीता अहिरे,वंदना चव्हाण,सुभाष पगार,केंद्र प्रमुख शरद कोठावदे,राजेंद्र गांगुर्डे, दादासाहेब ठाकरे,देवराम शार्दुल,दिनेश जगताप,चंद्रशेखर मोरे,मिरा खोसे,परशुराम चौरे, किसन पवार,विशेष तज्ञ ज्ञानेश्वर क्षीरसागर,रोहिणी परदेशी ,आरती डिंगोरे,प्रांजल कोथमिरे,समाधान दाते,दीपक पाटील,पौर्णिमा दीक्षित,वैशाली तरवारे,अश्विनी जाधव,रिना पवार आदी उपस्थित होते.