
✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)
चिमूर(दि.23जानेवारी):-राज्य परिवहन महामंडळ चिमूर आगारात १८ जानेवारी ला “सुरक्षीतता मोहीम” चा शुभारंभ आगार व्यवस्थापक राकेश बोधे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला.सदर कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणुन प्राचार्य सुधीर पोहीनकार,कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन आगार व्यवस्थापक राकेश बोधे उपस्थित होते.सुधीर पोहीनकर यांनी महामंडळात प्रवाशांची सुरक्षीतता कशी घ्यावी याबाबत चालकांनी घ्यावयाची काळजी व सुरक्षीतता याबाबत मार्गदर्शन केले.
तसेच आगार व्यवस्थापक राकेश बोधे यांनी सुध्दा सुरक्षीतता मोहिमेचे महत्व पटवुन दिले वाहतूक निरीक्षक इमरान शेख यांनी सुध्दा तत्पुर्वी आगारातील चालक वाहक प्रशासकीय यांना मार्गदर्शन केले यांत्रीक कर्मचा-यांना सुरक्षीतता मोहीमेचे बिल्ले वाटप करण्यात आले सदर कार्यकमाचे संचालन व आभार प्रदर्शन लिपिक उमेश मात्रे यांनी केले मनोज वाहाने, गजानन पुलुरवार, प्रशांत नौकरकार, यांनी कार्यक्रमास सहकार्य केले.
