मातंग समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्द:खा. श्रीनिवास पाटील

27

🔹शिष्टमंडळाला दिले आश्वासन :माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांचा शिष्ठामंडळात समावेश

✒️कराड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कराड(दि.24जानेवारी):- मातंग समाजाचे विविध प्रश्न, समस्या आहेत त्याकडे डोळेझाक करून चालणार नाही, आपले सारखी चळवळीतील मंडळी पुढे येत असल्यामुळे शासन प्रशासन जागे होत आहे.मातंग समाजाचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी सातारा मतदार संघांचे खासदार म्हणून कटीबद्द आहे असे आश्वासन सातारा लोकसभा मतदार संघांचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी ‘मातंग समाजाच्या शिष्टमंडळाला चर्चेदरम्यान दिले.

माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या नेतृत्वाखाली रामभाऊ सातपुते, रामभाऊ दाभाडे, संजय तडाखे, सुरेश बडेकर,मातंग विकास परिषदेचे अध्यक्ष विश्वास मोहिते, अमोल साठे, संतोष माने, उद्योजक श्रीकांत कांबळे, दत्तात्रय भिसे सह विविध मातंग समाजाचे शिष्टमंडळ यांनी विविध प्रश्नावर चर्चा करण्यासाठी खा. श्रीनिवास पाटील यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी खा. पाटील म्हणाले, मातंग समाजाचे विविध प्रश्न आहेत त्यापैकी तासवडे एम. आय. डी. सी मध्ये मातंग समाजाला उद्योग करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून मिळवून देण्यासाठी संबंधीतांना लवकरच सूचना देणार असल्याचे यावेळी सांगितले, विशेष म्हणजे जिल्हा उद्योग केंद्रात मातंग समाजातील 50 उधोजकांना कर्जप्रकरणाबाबत शिफारस पाठविण्याचे आदेश ही खा. पाटील यांनी उद्योग केंद्राला दिले.
यावेळी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे म्हणाले, मातंग समाजाचं नाव घेऊन चळवळीमध्ये आलो आहे त्यामुळे मातंगांच्या प्रश्नावर लढण्यासाठी कधीही मागे हटणार नाही.

🔹पाटील -मातंग अतूट नातं -खा. पाटील
चर्चेदरम्यान खा. श्रीनिवास पाटील अचानक भावुक झाले. माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे आणि मी पूर्वी एकत्रित काम केले आहे, माझे चांगले मित्र आहेत. आता कामाच्या दिशा वेगळ्या असल्या तरी आम्ही जुने आणि आत्ताही मित्रच आहोत असे बोलता बोलता मांग आणि पाटील अतूट नातं आहे. असे बोलताच काहींचे डोळे पाणवले.

*विश्वास मोहिते यांचा माजी मंत्र्यांच्या हस्ते सत्कार*
मातंग समाजातील कार्यकर्ते एकत्रित आल्यानंतर अचानक माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांचे आगमन झाले मातंग समाजाच्या विविध विषयावर चर्चा झाल्यानंतर समाजातील पत्रकार विश्वास मोहिते यांना राज्य शासनाची अहीस्वीकृती जाहीर झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.