दिवशी(बु.)येथील मुलीच्या बलात्कार प्रकरणी कुंडलवाडी कडकडीत बंद

    33

    ✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो9970631332

    बिलोली(दि.24जानेवारी):-तालुक्यातील कुंडलवाडी येथे
    भोकर तालुक्यातील दिवशी(बु.)येथील पाच वर्षीय आदिवासी मन्नेरवालू समाजातील मुलीच्या बलात्कार व खुन प्रकरणाचा निषेध व या प्रकरणातील आरोपीस फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी आज दि.२३ जानेवारी रोजी कुंडलवाडी शहर बंदची हाक देण्यात आली होती. यास मुख्य बाजारपेठ, बसस्थानक, चुंगीनाका परिसरातील व्यापा-यांनी,दुकानदारांनी,हाँटेल चालकांनी व सर्व दुकान चालकांनी आपापली प्रतिष्ठाने व व्यवहार शंभर टक्के बंद ठेवून बंदमध्ये सहभाग नोंदविला.

    सर्व समाजाच्या वतीने डॉ. हेडगेवार चौकात पिडीत मुलीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सयाराम मुकेरवार,अनिल पेंटावार,लखन नागुलवार,सर्पमित्र विजय गुप्ता,श्रीनिवास नरावाड,लक्ष्मण पेंटावार,राजेश कोंडावार,संजय गोनेलवार,रमेश ब्यारमवार,साईनाथ ठकुरवार,अशोक नागुलवार,शिवमनी नागुलवार,राजू पुपलवार,साईनाथ पोरडवार,साईनाथ,येवतीवाड,रवि कममवार,साईराम पेंटावार,रामलु पेंटावार,रवि पेंटावार,लोकेश पोदरोड,भत्ते विष्णु,दुमने राहुल,पेंटावार रमेश,सयाराम पेंटावार,अभिषेक शिंदे,प्रणव रत्नागिरे,गंगाधर नामसमवार,सुरेश बिरमवार,गौतम वाघमारे,साईनाथ शेट्टीवार,साईनाथ भोकरे,साई माहेवार,लालु ऎनलावार,यांच्यासह शेकडो नागरीक उपस्थित होते.यावेळी चोख पोलीस बंदोबस्त होता.