बेरोजगार दिव्यांग 27 जानेवारीला शोले स्टाईल आंदोलन करणार

26

🔹बेरोजगार दिव्यांगांच्या मागण्या जोवर मान्य होणार नाहीत तोवर शोले स्टाईल आंदोलन कायम ठेवणार असल्याचे राहुल साळवे यांनी मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांना सादर केले निवेदन

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.24जानेवारी):- गत अनेक वर्षांपासून लोकशाही मार्गाने विविध निवेदणे देऊन आंदोलने उपोषणे करून तसेच मोर्चे काढून हि बेरोजगार दिव्यांगांचे प्रलंबित विविध मागण्यांची अद्याप अंमलबजावणी झाली नसल्यामुळे दि 27 जानेवारी 2021 रोजी बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल सिताराम साळवे यांनी शोले स्टाईल आंदोलन करणार असल्याचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर केले तसेच या निवेदनातील 26 जानेवारी 2021 रोजी प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना घेराव घालत जन आक्रोश आंदोलन करणार असल्याच्या बाबतीत पोलिस उपविभागीय अधिकारी वजीराबाद नांदेड आणि वजिराबाद पोलिस स्टेशनसह शिवाजी नगर पोलीस स्टेशन यांनी समीतीचे अध्यक्ष राहुल साळवे यांना बोलावून घेत कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत सांगुन तसेच पोलिस प्रशासनाला सहकार्य करत प्रजासत्ताकदिनीचे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्या बाबत विनंती केली असता पोलिस प्रशासनाच्या विनंतीला मान देत राहुल साळवे यांनी 26 जानेवारी 2021 रोजीचे प्रजासत्ताकदिनीचे घेराव आंदोलन तात्पुरते स्थगित करत असल्याचे लेखी पत्र दिले तसेच दि 27 जानेवारी 2021 रोजीचे शोले स्टाईल आंदोलन कायम ठेवणार असल्याचे पत्रात नमूद केले.

त्यामुळे दि 27 जानेवारी 2021 रोजी बेरोजगार दिव्यांगांच्या प्रलंबित विविध न्याय हक्कासाठी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड.महानगरपालिका नांदेड आणि जिल्हा परिषद नांदेड या शासकीय कार्यालयांसह जवळिल पाण्याच्या टाकिवर चढुन जोवर मागण्या मान्य होणार नाहीत तोवर खाली उतरणार नाही असे राहुल साळवेसह प्रदिप गुबरे,सुनिल जाधव.नागनाथ कामजळगे.प्रदिप हणवते.कार्तिक भरतीपुरम.राजकुमार देवकर,संजय धुलधाणी.रवि कोकरे.भोजराज शिंदे, व्यंकट कदम,मुंजाजी कावळे.विठ्ठल सुर्यवंशी,संजय सोनुले.साहेबराव कदम, अब्दुल माजीद शेख चांद,प्रशांत गायकवाड,प्रशांत हणमंते.सिद्धोधन गजभारे.मनोहर पंडित.सय्यद आरिफ.राजु ईराबतीन.शेख आतिक.नागेश निरडी.सय्यद हाकिम,गणेश मंदा.शेख आलीम,कमलबाई आखाडे आणि सविता गावते यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.