जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही – रेवती सपताळे

31

✒️कुशल रोहिरा(सातारा,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9763526231

सातारा(दि.२४जानेवारी):- सस्तेवाडी ग्रामपंचायत निवडणूकीत महादेव पॅनल हा जनतेच्या विश्वासाच्या बळावर निवडून आला आहे. जनतेने दाखवलेल्या या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे मत सस्तेवाडी ग्रामपंचायत निवडणूकीत विजयी मिळाल्याल्या उमेदवार रेवती सपताळे यांनी केले.
सस्तेवाडी ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल जाहिर होताच कार्यकार्त्यानी गुलाल उधळून जल्लोष केला. हा विजय म्हणजे शंकर(अण्णा) जाधव यांनी मला वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळेच झाला आहे. मला निवडून आणण्यामागे त्याचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. माझ्या विजयात त्याचा खुप मोठा वाटा आहे.

त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास आहे त्याच्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही. दातेवस्ती तसेच महादेव नगरमधिल विकासकामे करण्यासाठी माझा नेहमीच पुढाकार राहील. विकास कामे करताना सर्वाना विचारात घेऊन कामे करणार तसेच सस्तेवाडीतील प्रत्येक वॉर्ड मधील राहिलेली अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करेन. सुनील वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कामे करण्यासाठी एक आराखडा तयार करणार व वॉर्ड मद्ये जेवढ्या शासकीय योजना आणता येतील तेवढ्या आणण्याचा माझा प्रयत्न असेल असे मत सस्तेवाडी ग्रामपंचायत विजयी उमेदवार रेवती सपताळे यांनी केले.