सोलापूरातील बेरोजगार अभियंतांना (इंजिनिअर) नवीन कौशल्य उद्योग सुरु करणे व तसेच इतर अडचणी सोडविण्याकरीता आ. प्रणिती शिंदे यांनी घेतली बैठक

    37

    ?इंजिनिअरांसाठी काँग्रेस पक्षामध्ये विशेष सेल सुरु करणार : आ. प्रणिती शिंदे

    ✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293

    सोलापूर(दि.24जानेवारी):- आज दिनांक 24 जानेवारी 2021 रोजी आमदार प्रणिती शिंदे यांची शासकीय विश्रामगृह, सात रस्ता, सोलापूर येथे बेरोजगार अभियंता (इंजिनिअर) यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीमध्ये आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरातील बेरोजगार अभियंतांना सोलापूरात नवीन कौशल्य उद्योग सूरू करण्यासाठी व त्याच्याशी संबंधित येणाऱ्या विविध अडचणी जाणून घेतल्या.

    सदर अडचणींचे निवारण करण्याकरीता काँग्रेस पक्षामध्ये विशेष सेल सुरु करणार व त्याच्या माध्यमातून बेरोजगार अभियंता यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यात येतील असे आश्वासन आमदार प्रणिती शिंदे यांनी दिले. यावेळी प्रा. सारंग तरे सर (सदस्य जिल्हा रस्ता सुरक्षा समिती, सोलापूर), अभियंता रुपेश गायकवाड, अतूल सरसॅट, रोहित जैस्वाल आदि. सोलापूरातील बहुसंख्य बेरोजगार अभियंता उपस्थित होते.