राष्ट्रीय कन्या दिनानिमित्त ‘बेटी बचाव बेटी, पढाव अभियान जनजागृती उपक्रम

29

🔹युवकमित्र परिवाराचा उपक्रम

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)मो:-9561905573

पुणे(दि.25जानेवारी):-राष्ट्रीय कन्या दिनानिमित्त ‘युवकमित्र परिवारामार्फत ‘बेटी बचाव बेटी बचाव जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. यावेळी शनिवारवाडा, महात्मा फुले वाडा, साने गुरूजी स्मारक परिसरात युवकमित्र परिवाराच्या स्वयंसेवकांनी महिला व विद्यार्थ्यांना बेटी बचाव अभियानपर संदेश असलेले ५०० स्टिकर्स वाटप केले.

महात्मा फुले वाडा येथे झालेल्या कार्यक्रमात युवकमित्र परिवाराचे संस्थापक प्रवीण महाजन यांनी भारतात लिंग गुणोत्तराचे अल्प असलेलं प्रमाण, त्याची कारणे,महिलांचा साक्षरतेत असलेला अल्प वाटा याबद्दल चर्चा घडवून आणली व उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी बेटी बचाव बेटी बचावच्या घोषणानी परिसर दुमदुमून गेला होता.कार्यक्रमप्रसंगी महात्मा फुले बहुजन महासंघाचे अध्यक्ष सुनील अस्वरे,राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष चेतन शिंदे,प्रवीण देवकुळे,संदीप आढाव,श्याम कदम,संतोष देवकुळे,दलीतमित्र दिलीपभाऊ माळी, वंदना माळी,दादाजी पवार उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी संवेदना फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश माळी, पिंटू भदाणे यांनी परिश्रम घेतले.