श्री दत्त दिव्यांग निराधार सेवाभावी टाकवडे यांच्यातर्फे रत्नागिरी जिल्हा प्रमुख व कोल्हापूर जिल्हा प्रमुख यांची नियुक्ती

23

✒️माधव शिंदे(विशेष प्रतिनिधी)मो:-7757073260

रत्नागिरी(दि.25जानेवारी):- श्री दत्त दिव्यांग निराधार सेवाभावी संस्था यांच्या कार्याची दखल घेऊन राज्यभर प्रतिनिधित्व साठी दिव्यांगाच्या साठी व निराधार लोकांच्या साठी काम करणाऱ्या लोकांची रीघ लागलेली आहे त्यातील खरोखरच जे खरोखरच तळमळीने काम करणारे व्यक्ती आहे त्यांची दखल घेऊन श्रीदत्त दिव्यांग निराधार सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय पाटील व त्यांच्या संचालक मंडळांनी निर्णय घेऊन आज कोल्हापूर येथे रत्नागिरी जिल्हा प्रमुख नितीन पाटणकर व कोल्हापूर जिल्हा प्रमुख सुरज सनदे त्यांची निवड करून त्यांना संस्थेतर्फे पत्र व संस्थेचा आयडी देऊन संस्थेमध्ये स्वागत केले.

संस्थेच्या त्यांच्या या नियुक्तीला संचालक मंडळाने होकार दिला ते असेच दिव्यांगांसाठी व निराधार लोकांच्या साठी काम करो व संस्थेचे नाव उज्वल करू अशी सदिच्छा व्यक्त करून सर्व संचालक मंडळांनी संस्थेमध्ये त्यांचे स्वागत केले यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील उपाध्यक्ष सुरेश माळी भारतीय जनता पार्टीच्या शिरोळ तालुका सरचिटणीस अरुणा गायकवाड संचालक राजू पाटील संस्थेचे वकील श्रीधर पाटील संचालक सुनिता पाटील हजर होते.