राष्ट्रीय मतदार दिनी नवमतदार व निवडणूक कर्मचारी यांचा सन्मान

28

🔸जिल्हाधिकारी यांनी उपस्थितांना दिली लोकशाही वर निष्ठा ठेवण्याची शपथ

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

गडचिरोली(दि.25जानेवारी):-अकराव्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी जिल्हयातील नवमतदारांचा डिजीटल ओळखपत्र देवुन सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी जिल्हयातील काही निवडणूक कर्मचाऱ्यांचा प्रतिनिधीक स्वरुपात उत्कृष्ट कार्य केल्या बद्दल सन्मान केला. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी उपस्थितांना लोकशाहिवर निष्ठा ठेवण्याची मतदान शपथ दिली. यावेळी कार्यक्रमाला अप्पर जिल्हाधिकारी अनंत वालस्कर, उपजिल्हाधिकारी धनाजी पाटिल, उपजिल्हाधिकारी निवडणूक कल्पना निळ ठुबे, निवासी उपजिल्हाधिकारी श्री. तळपाडे, पूरवठा अधिकारी नरेंद्र भागडे, तहसिलदार गडचिरोली महेंद्र गणवीर, इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिपप्रज्वलन झाल्यानंतर जिल्हयातील नवमतदारांना प्रातिनिधीक स्वरुपात मतदान ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. यामध्ये निखिल पडगेलवार, प्रतिक्षा पिपरे, सलमान शेख, विकास शेंडे, अनिकेत पडगेलवार व मोहित पिंपरे यांचा समावेश होता. तसेच मतदार दिना निमित्त मागील आठवडयात चित्रकला, रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यातील विजेत्यांना उपस्थित मान्यवरांनी प्रशस्तिपत्रक व पुष्पगुच्छ देवून सन्मानित केले. यातील विजेत्यांमध्ये चित्रकला स्पर्धेत दर्शना वंजारी, रितीका गोहणे व आशिष शेडमाके यांचा समावेश होता. रांगोळी स्पर्धेत पायल भोयर, रितीका सुधीर गोहणे व रितीशा आडेपू यांना सन्मानित करण्यात आले. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा सन्मानही यावेळी केला या उत्तम खेवले (कोटवार), पी. बी. जनबंधु (प्रा.शि.) व विजय भांडेकर (कनिष्ठ लिपीक) यांचा समावेश होता.

*अनंत वालस्कर, अप्पर जिल्हाधिकारी* – ” इतर राष्ट्रीय दिनांसारखेच या मतदार दिनाचे महत्व असून तो दिवस उत्साहाने साजरा करणे गरजेचे आहे. या दिवसाची आठवण प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. सर्व प्रकारच्या निवडणूका अतिशय पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी मतदारांनी आपले योगदान दिले पाहिजे. दुबार नावे असलेले, मृत्यू झालेले तसेच लग्न झाल्यानंतर गाव सोडलेल्या महिला यांची नावे तपासून मतदार यादी अद्यावत झाल्यास मतदानाच्या टक्का वाढेल.”

या कार्यक्रमात मुख्य निवडणूक आयुक्त, भारत सरकार यांचा मतदारांना देण्यात आलेला संदेश चलचित्र स्वरुपात कार्यक्रमावेळी दाखविण्यात आला. तसेच या कार्यक्रमाचे आभार तहसिलदार महेंद्र गणवीर यांनी मानले. सुत्रसंचलन नायब तहसिलदार देवेद्रं दहिकर यांनी केले.