आ. प्रणिती शिंदे यांची जिल्हा होमगार्ड कार्यालयास भेट विविध समस्यांची केली पाहणी

30

🔸नुतनीकरणास लवकरच निधी उपलब्ध करून देणार

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293

सोलापूर(दि.26जानेवारी):-आमदार प्रणिती शिंदे यांनी आज दि. 25 जानेवारी 2021 रोजी जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालय, आय.टी.आय. कॉलेज मागे, विजापूर रोड, सोलापूर भेट देवून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

यामध्ये जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालय असून ते जुलै 1986 सालची असून साधारणत: 34 वर्षे जूनी आहे. सदर इमारतीचे छत हे कौलारुचे असून कौलारू खराब झाल्यामुळे पावसाळ्यामध्ये त्यातून पाण्याची गळती होत असून छताची मोठ्याप्रमाणात पडझड झालेली आहे. तसेच सतत पाणी झिरपण्यामुळे स्टोअर रुम मधील जूनी अभिलेख, कोरे रजिस्टर व इतर साहित्य खराब झालेले आहेत. सदर कार्यालयामध्ये एकच संगणक संच व एकच प्रिंटर उपलब्ध असून संगणक संच वारंवार बंद पडत असल्यामुळे त्यांना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. 1) कार्यालय इमारत दुरुस्ती व रंगरंगोटी 2) पिण्याच्या पाण्याची टाकी व पाईप लाईन, 3) संगणक व प्रिंटर (5 नग), 4) हायमास्ट दिवे (5 नग) व इतर सोयी-सुविधांची अत्यंत आवश्यकता असल्याबाबत जिल्हा समादेशक, होमगार्ड सोलापूर यांनी आमदार प्रणिती शिंदे यांना सांगितले.

याकरीता आमदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालय येथील सोयी-सुविधांकरीता 1) कार्यालय इमारत दुरुस्ती व रंगरंगोटी (अंदाजित रक्कम 40 लाख), 2) पिण्याच्या पाण्याची टाकी व पाईप लाईन (अंदाजित रक्कम 8 लाख), 3) संगणक व प्रिंटर (5 नग), (अंदाजित रक्कम 5 लाख), 4) हायमास्ट दिवे (5 नग) (अंदाजित रक्कम 5 लाख) व इतर सोयी-सुविधांची कामे तात्काळ करण्याकरीता जिल्हा वार्षिक योजना सन 2020-21 अंतर्गत सुचविलेले आहे.