नक्षलवाद्यांनी एटापल्ली तालुक्यातील आलेंगा परिसरात जे.सी.बी ची केली जाळपोळ

29
✒️संतोष संगीडवर(आल्लापल्ली प्रतिनिधी)मो:-7972265275

एटापल्ली(दि.26जानेवारी):- नक्षलवाद्यांनी आज एटापल्ली तालुक्यातील आलेंगा परिसरात जे.सी.बी ची जाळपोळ केली आहे. कसंनसुर आलेंगा परिसरात रोड चे काम सुरू होत नक्षल्यानी या कामावर येऊन हे काम बंद पाडले. त्यानंतर रस्त्याच्या कामावरील जेसीबी ची जाळपोळ केली आणि मजुराला जाण्यास सांगितले हे काम भेट आपली येथील गौतम अधिकारी यांचे असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.

या बाबत पोलिस विभागाला विचारना केली असता त्यांनी घटनेबाबत दुजोरा दिला आहे मात्र अधिक तपशील देण्यास असमर्थता व्यक्त केली आहे. गणराज्य दिनाच्या पार्श्वभूमीवर या जाळपोळीच्या घटनेने दहशत निर्माण झाली आहे.